भाजीपाला पिकाबरोबर फळपिकावरही फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:10+5:302021-09-22T04:17:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव नेऊर : येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी दोन एकर पपई बागेवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटा ...

Plow turned on vegetable crop as well as fruit crop | भाजीपाला पिकाबरोबर फळपिकावरही फिरविला नांगर

भाजीपाला पिकाबरोबर फळपिकावरही फिरविला नांगर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव नेऊर : येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी दोन एकर पपई बागेवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटा मारून पपईची पूर्ण बाग उद्ध्वस्त केली. सव्वालाख खर्च केले अन् उत्पन्न सतरा हजार रुपये निघाल्याने वैतागलेल्या शिंदे कुटुंबाने शेतात उभ्या असलेल्या पपई पिकावर नांगर फिरविला.

प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पपई उपयुक्त आहे. पपईपासून चेरी, आइस्क्रीम ड्रायफूड, मिठाई, मसाला पान बनणाऱ्या विविध बाय प्रॉडक्टचा वापर मोठ्या प्रमाणात माणसाच्या आहारामध्ये केला जातो. पपई हे आरोग्यवर्धक फळ तर आहेच, शिवाय त्याचा माणसाच्या रोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केला जातो. अशा या बहुआयामी पपई फळासाठी वेगवेगळ्या जाती आयात करून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करतात, पण गेली काही दिवसांपासून भाजीपाला पिकाबरोबरच पपई या फळ पिकावरही नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शिंदे यांनी

आपली मुले गोकुळ, किरण यांच्या मदतीने २८ डिसेंबर २०२० ला दोन एकर क्षेत्रात तैवान ७८६ पपई बागेची लागवड केली. त्यात आंतरपीक

म्हणून टरबुजाची लागवड केली होती. टरबुजाचे जेमतेम अल्प

उत्पादन हाती आले होते. पपई पिकासाठी

रोप अठराशे नग, शेणखत, लिक्विड खत,

रासायनिक खते, मिक्स डोस, मल्चिंग पेपर, मशागत, मजुरी

आदी सव्वालाख

रुपये खर्च केला. त्यात पपईवर आलेल्या व्हायरसचा फटका बसून पपईपासून निघालेल्या चिकाचे सतरा हजार रुपये

उत्पन्न झाले.

केलेला खर्चाचा व बाजारभावाचा ताळमेळ बघता खर्च वसूल होणार

नाही अशी परिस्थिती झाल्याने नाइलाजाने शेतकरी पुत्रांनी

निराश होऊन ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात उभ्या असलेल्या पपई पिकावर रोटा फिरवून बाग उद्ध्वस्त

केली.

लाखोंचा खर्च पाण्यात गेला

इतर पिकांना फाटा देऊन मेहनतीने दोन एकर पपई बाग सव्वालाख रुपये खर्च करून उभी केली; परंतु पपई पिकावर आलेला व्हायरस व मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे फळ येऊनही खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने नऊ महिने कष्ट करून जपलेली पपईची बाग

ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटाव्हेटर फिरवून पूर्णपणे उद्ध्वस्त

केली.

- बाळासाहेब शिंदे, पपई उत्पादक

शेतकरी

(१८ जळगाव नेऊर)

जळगाव नेऊर येथील बाळासाहेब शिंदे यांची बहरलेली पपईची बाग.

180921\374418nsk_31_18092021_13.jpg

जळगाव नेऊर येथील बाळासाहेब शिंदे यांची बहरलेली पपईची फळबाग.

Web Title: Plow turned on vegetable crop as well as fruit crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.