काठेगल्लीत कारचालकाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 18:24 IST2018-09-02T18:23:53+5:302018-09-02T18:24:34+5:30
नाशिक : कारचारकास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचल्याची घटना शनिवारी (दि़१) भर दुपारच्या सुमारास काठेगल्ली परिसरात घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित रोहित चांडोले (रा. काठेगल्ली) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगरमधील गणेश जाधव हे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आपले कारने काठेगल्लीतील समर्थनगर टी पॉइंटजवळून जात होते़ त्यांना दुसऱ्या कारमधून आलेल्या संशयित रोहीत चांडोले याने अडविले व शिवीगाळ सुरू केली़ यानंतर जाधव कारखाली उतरले असता त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोन्याचे चेन चांडोले याने खेचली तसेच मोबाईलचे नुकसान करून फरार झाला़
याप्रकरणी जाधव यांनी भदकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दिली आहे़