पीएम किसान निधीसाठी आता ‘आधार’ हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 02:02 AM2019-12-13T02:02:41+5:302019-12-13T02:02:57+5:30

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

PM Kisan Fund now needs 'support' | पीएम किसान निधीसाठी आता ‘आधार’ हवाच

पीएम किसान निधीसाठी आता ‘आधार’ हवाच

Next
ठळक मुद्देनिधी मिळण्यास अडचण : नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शेतकरी आधारसंलग्न नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत प्रतिवर्ष शेतकºयांना दहा हजार रुपये तीन टप्यात देण्याची योजना आहे. शेतकºयांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. पहिले दोन हप्तातील रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. मात्र आता ज्यांचे बॅँक खाते आधारलिंक आहेत आणि त्यांची माहिती आधाराशी जोडण्यात आली आहे अशााच शेतकºयांना लाभ होणार आहेत.
जिल्ह्णात सुमारे तीन लाख शेतकरी लाभार्थी आहेत. नियमांमध्ये बदल करण्यात आल्यानुसार नोव्हेंबर अखेरीस शेतकºयांनी माहिती आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि संकेतस्थळावरही व्यवस्था करण्यात आली होती. असे असतानाही सुमारे तीन लाख शेतकºयांपैकी केवळ ५० हजारांच्या जवळपास शेतकरी माहिती आधार लिंक करू शकले. उर्वरित शेतकºयांनी अजूनही माहिती लिंक केली नसल्यामुळे त्यांना डिसेंबरमध्ये मिळणारा तिसरा हफ्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.
शेतकºयांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. या कालावधीत जिल्ह्णातील केवळ ५० ते ५५ हजार शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासन अपडेट करू शकले आहेत. वेब पोर्टलवर सदर माहिती अपलोड करावी लागते. यासाठी वेळही बरच लागतो. त्यामुळे या पोर्टलरव सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
व्यस्त यंत्रणेमुळे गती मंदावली
महाराष्टÑात निवडणुका असल्यामुळे आधार लिंक करण्याची प्रक्रिया काहीशी विलंबाने झाल्यामुळे लाखो शेतकरी या योजनेत आपली माहिती परिपूर्ण भरू शकलेले नाहीत. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या यंत्रणेमुळे नोंदणी काहीशी मागे पडली होती. पुढीलवर्षी २०२० पर्यंत सर्व शेतकºयांची माहिती आधार लिंक केली जाणार असलचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

Web Title: PM Kisan Fund now needs 'support'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.