मोदी, शाह यांच्या दौऱ्याचे प्रशासनाला टेन्शन
By Sandeep.bhalerao | Published: January 2, 2024 01:36 PM2024-01-02T13:36:31+5:302024-01-02T13:37:08+5:30
संदीप युनिर्व्हसिटी पदवीदान सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहाणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
संदीप भालेराव, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल रमेश बैस याशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. येत्या १२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युवा संमेलनासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. त्यानंतर २७ आणि २८ जानेवारीस केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह नाशिकमध्ये नागरी सहकारी बँक्स अधिवेशन उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. याशिवाय ५ जानेवारी रोजी संदीप युनिर्व्हसिटी पदवीदान सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहाणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हेे दि. ४ रोजी एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तर तर १६ जानेवारी रोजी पोलिसांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहाणार आहेत. पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार असल्याने नियोजनासाठी मंत्र्यांचे दौरे देखील वाढणार आहेतच शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील युवा महोत्सवाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी जिल्हा तसेच पोलीस प्रशासन नियोजनात गुंतले आहेत.