‘पीएमएवाय’मध्ये राज्यात नाशिक प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:17 AM2018-09-02T00:17:18+5:302018-09-02T00:19:11+5:30

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्णाला शनिवारी (दि.१) मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्य सचिव डी. के. जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला.

'PMAY' in Nashik first in the state | ‘पीएमएवाय’मध्ये राज्यात नाशिक प्रथम

‘पीएमएवाय’मध्ये राज्यात नाशिक प्रथम

Next
ठळक मुद्देआढावा बैठकीत गौरव : जिल्हास्तरावर तीन, तर तालुक्यांना नऊ पुरस्कार

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्णाला शनिवारी (दि.१) मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्य सचिव डी. के. जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्णासह चांगले काम करणाऱ्या तालुक्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्णाला प्रधानमंत्री आवास योजनेत विविध श्रेणीत तीन, तर तालुक्यांना नऊ असे तब्बल १२ पुरस्कार मिळाले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडको भवन बेलापूर, मुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणाºया जिल्ह्णांना व तालुक्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. आॅगस्टअखेर २२ हजार १४१ घरकुल पूर्ण करून राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या व बांधकाम टक्के वारीत राज्यात द्वितीय क्रमांक असेलल्या नाशिक जिल्ह्णाला सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेत आॅगस्टअखेर ४ हजार ४०१ घरकुलांच्या योगदानाबाबतही सन्मान करण्यात आला. पूर्ण घरकुलांच्या टक्के वारीत दुसºया क्रमांकासाठी नाशिक तालुक्यास, दोन हजारांपेक्षा जास्त घरकुल पूर्ण करणाºया तालुक्यामध्ये मालेगाव, बागलाण, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मालेगाव तालुक्यास, पूर्ण घरकुलांच्या संख्येनुसार राज्यातील पहिल्या १० मध्ये असलेले जिल्ह्णातील दिंडोरी, निफाड व बागलाण या तालुक्यांमधील गट विकास अधिकाºयांना यावेळी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.देशात नाशिकचा ३८वा क्रमांकप्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, घरकुल बांधकामात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात दहा हजारांपेक्षा जास्त बांधकाम करणाºया जिल्ह्णामध्ये नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत गेल्या चार महिन्यांपूर्वी देशात २२५ क्रमांकावर असलेला नाशिक जिल्हा आता ३८व्या क्रमांकावर पोहचला आहे.

Web Title: 'PMAY' in Nashik first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक