जात्यावरील ओवींमुळेच कविता जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:50 PM2020-02-02T22:50:14+5:302020-02-03T00:24:00+5:30

जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण पुरी यांनी केले.

The poem lives because of the ovaries on the caste | जात्यावरील ओवींमुळेच कविता जिवंत

रानवड महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी नारायण पुरी, व्ही. एस. शिरसाठ, एस. पी. कदम, रामभाऊ पानगव्हाणे, रामभाऊ आहेर, अशोक सोमवंशी, विलास वाघ, दीपक वाघ आदी़

Next
ठळक मुद्देनारायण पुरी : रानवड महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ




पिंपळगाव बसवंत : जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण पुरी यांनी केले.
रानवड येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य व्ही. एस. शिरसाठ, एस. पी. कदम, प्रा. ऐश्वर्य पाटेकर, रामभाऊ पानगव्हाणे, रामभाऊ आहेर, अशोक सोमवंशी, विलास वाघ, दीपक वाघ, महेश होळकर, मेघा रायते, गणेश आवारे आदी उपस्थित होते. आज राजकीय झेंडे घ्याल तर उद्या धोंडे हाती येतील, त्यामुळे युवकांनी फक्त तिरंगा झेंडाच हातात घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. महेश होळकर यांनी केला. प्रा. भाग्यश्री मोरे व ऐश्वर्या ताकटे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. आवारे यांनी आभार मानले.

आईसाठी, मातृभूमीसाठी रक्त सांडता येते तोच खरा देशभक्त
कवी पुरी यांनी ‘प्रेमाचा जंगडगुत्ता’ ही कविता सादर करताना त्यांनी बाहुबलीला कटपाने का मारले हा प्रश्न भारताला पडला होता; पण दाभोलकरांना का मारले? त्यांचे आरोपी कोण, हा प्रश्न भारताला नाही, फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना जरी पडला असता तरी आज त्यांचे मारेकरी कारागृहात असते, असे परखड मत मांडले. ज्याला आईसाठी व मातृभूमीसाठी रक्त सांडता येते तोच खरा देशभक्त असतो. कोणीही रंगावर जाऊ नये. जे ढग काळे असतात त्यातच पाणी असते. काळा रंग निर्मितीचे प्रतीक आहे. कवीने सामान्य माणसांच्या वेदना मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे. समाजात साप, सरडे निर्माण होऊ नये हाच साहित्यिकांचा उद्देश असतो, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The poem lives because of the ovaries on the caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.