बे बे बकरी... नाटकातून देशाच्या राजकीय स्थितीवर उपरोधिक भाष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:47 AM2018-11-29T00:47:04+5:302018-11-29T00:47:20+5:30
राजकीय पुढाऱ्यांकडून भोळ्याभाबड्या ग्रामीण जनतेची दिशाभूल करून धर्म अन् श्रद्धेचा बाजार मांडत भावनांशी खेळ करत कशाप्रकारे फसवणूक केली जाते आणि त्यास ‘खाकी’ची कशी साथ लाभते, यावर रंगमंचावरून सध्याच्या राजकीय स्थितीवर उपरोधिक भाष्य करण्यात आले.
राज्य नाट्य स्पर्धा
नाशिक : राजकीय पुढाऱ्यांकडून भोळ्याभाबड्या ग्रामीण जनतेची दिशाभूल करून धर्म अन् श्रद्धेचा बाजार मांडत भावनांशी खेळ करत कशाप्रकारे फसवणूक केली जाते आणि त्यास ‘खाकी’ची कशी साथ लाभते, यावर रंगमंचावरून सध्याच्या राजकीय स्थितीवर उपरोधिक भाष्य करण्यात आले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असलेल्या ५८व्या राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी (दि. २८) संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची निर्मिती असलेल्या ‘बे बे बकरी’ हा प्रयोग सादर करण्यात आला. राजकीय शक्तीचा वापर करत ग्रामीण जनतेच्या धार्मिक भावना व अंधश्रध्देचा फायदा उचलून ‘अर्थ’कारण करण्याचा प्रयत्न होतो. गावामधील एका गरीब महिलेची पांढºया रंगाची शेळी पळवून आणली जाते आणि ती शेळी त्या महिलेची नसून चक्क बापूंची असल्याचे सांगितले जाते. त्यास स्वातंत्र्यामधील त्याग, समर्पणाची जोड देत शेळीच्या पूजापाठातूनच गाव समृध्द होईल, असे चित्र भोळ्याभाबड्या गावकºयांपुढे रंगविण्याचा प्रयत्न गावातील सालदार, हवालदार, धर्मगुरूंकडून केला जातो.
मध्यंतरापूर्वीच या गावात ‘बापूंच्या शेळी’चे मंदिर उभारले जाते. मध्यंतरानंतर निवडणुका जिंकून सत्ता काबीज केली जाते. यासाठी वापर केला जातो तो म्हणजे बापूंच्या ‘शेळीचा’ असे या प्रयोगाचे कथानक फिरत जाते. त्यानंतर हा भपंकपणा एक जागरूक तरुण हाणून पाडण्याचा प्रयत्न करत गावकºयांमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात करतो; मात्र राजकीय शक्ती आणि दबावापुढे तो अपयशी ठरतो. याउलट त्याला ‘नक्षलवादी’ ठरवून तुरुंगात डांबले जाते.
दिलीप जगताप लिखित, रवींद्र कटारे दिग्दर्शित या प्रयोगात दिलीप काळे, भूषण गायकवाड, गणेश गायकवाड, समाधान मुर्तडक, अर्चना कडाळे, विकास जुवेकर, आश्विनी सूर्यवंशी, स्नेहा सूर्यवंशी, आकाश कंकाळ, अनुप ताकटे आदींनी भूमिका साकारल्या. नेपथ्य संदीप गायकवाड यांचे तर रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा सचिन चव्हाण आणि प्रकाशयोजना रवि रहाणे यांची
होती. आजचे नाटक : बिघडलेली नाती, वेळ : सायंकाळी ७ वाजता