वडनेरला कवितेची अक्षरशेती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:59 PM2020-01-22T22:59:16+5:302020-01-23T00:19:31+5:30

मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात युवा सप्ताहानिमित्त ‘कवितेची अक्षरशेती’ हा निमंत्रित कवींच्या उपस्थितीत काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित कवींनी सादर केलेल्या सामाजिक आशयाच्या कवितांनी मैफलीत रंगत आणली.

Poetic Literacy Program for Wadner | वडनेरला कवितेची अक्षरशेती कार्यक्रम

वडनेरभैरव महाविद्यालयात युवा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात कविता सादर करताना राजेंद्र सोमवंशी. समवेत प्राचार्य ए. एल. भगत, उपप्राचार्य निशांत वडघुले, प्रशांत केंदळे, विष्णू थोरे व संदीप देशपांडे आदी.

Next

वडनेरभैरव : येथील मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात युवा सप्ताहानिमित्त ‘कवितेची अक्षरशेती’ हा निमंत्रित कवींच्या उपस्थितीत काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित कवींनी सादर केलेल्या सामाजिक आशयाच्या कवितांनी मैफलीत रंगत आणली.
या मैफलीत प्रशांत केंदळे यांनी ‘बापलेक’, विष्णू थोरे यांनी ‘मनातल्या गुपिताचं खोल तू राज गं’, राजेंद्र सोमवंशी यांनी ‘माई सावित्रीने दिले आम्हा लेखनाचे बळ’, तर संदीप देशपांडे यांनी ‘जागोजागी भेटते मला माझी मुलगी’ ही कविता सादर केली. सर्वच कवितांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कवी थोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य ए. एल. भगत यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. व्यासपीठावर उपप्राचार्य निशांत वडघुले, ज्यू कॉलेज प्रमुख एच. एन. बच्छाव, गुणगौरव सोहळा प्रमुख व्ही. एस. जाधव, एस. एम. कुमावत ,प्रा. डी. डी. गव्हाणे आदी उपस्थित होते.

Web Title: Poetic Literacy Program for Wadner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.