सटाणा महाविद्यालयात कविसंमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:43 PM2020-01-08T23:43:58+5:302020-01-08T23:44:25+5:30
सटाणा : येथील महाविद्यालयात नववर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविसंमेलन उत्साहात पार पडले.
सटाणा : येथील महाविद्यालयात नववर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविसंमेलन उत्साहात पार पडले. ज्येष्ठ अहिराणी कवी डॉ. एस. के. पाटील व निसर्गकवी तुकाराम धांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात महाविद्यालयातील प्रतिभावान कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. डॉ. धोंडगे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. एस. के. पाटील यांनी कवितेचे महत्त्व सांगताना कवितेत समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. समाजाचे सुख, दु:ख, व्यथा,
वेदना, कवितेतून व्यक्त होतात, असे सांगून विनोदी शैलीतून अहिराणी कविता सादर केल्या. यासह राजकारणावर आधारित तसेच कौटुंबिक व प्रेम कवितांचे सादरीकरण केले. कविसंमेलनात अस्मिता तांबे, निकिता पवार, निकिता गुंजाळ, प्रियंका कापडणीस, शुभम अहिरे, प्रगती देवरे, उज्ज्वला शिंदे, धनश्री येवला या विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बी. आर. पवार, डॉ. मनीषा सोनवणे, प्रा. पी. आर. पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. बी. राठोड यांनी केले. प्रा. एन. आर. निकम यांनी आभार मानले.