कवयित्रींचे काव्यसंमेलन रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:09 AM2019-09-23T00:09:28+5:302019-09-23T00:10:03+5:30
‘आम्ही लेखिका’ या संस्थेच्या वतीने आयोजित काव्यसंमेलन सामाजिक वास्तव, जीवनातील सुख-दु:ख आणि शहरी व ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती यावर भाष्य करणाऱ्या विविध कविता नवोदित आणि प्रसिद्ध कवयित्रींनी सादर केल्या. या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी ‘श्वास मोकळा घेते’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
नाशिक : ‘आम्ही लेखिका’ या संस्थेच्या वतीने आयोजित काव्यसंमेलन सामाजिक वास्तव, जीवनातील सुख-दु:ख आणि शहरी व ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती यावर भाष्य करणाऱ्या विविध कविता नवोदित आणि प्रसिद्ध कवयित्रींनी सादर केल्या. या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी ‘श्वास मोकळा घेते’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कृषिनगर येथील श्रीसंत ज्ञानेश्वर वाचनालयात रविवारी (दि.२२) ‘आम्ही लेखिका’ या ग्रुपच्या वतीने काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका प्रा. डॉ. वेदश्री थिगळे उपस्थित होत्या. व्यासपीठावर अॅड. मिलन खोहर, प्रा. प्रीती गायकवाड आदी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री डॉ. कविता बोंडे होते. याप्रसंगी कवयित्री अलका कुलकर्णी व प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांनी संपादित केलेल्या ‘श्वास मोकळा घेते’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ज्योत्स्ना पाटील लिखित अंतरंग सुगरणींची, खवय्येगिरी सर्वांची या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच ज्येष्ठ कवयित्री प्रा. सुमती पवार यांच्या सुमतीचे श्लोक भाग-२ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. थिगळे यांनी आपल्या भाषणात स्त्री जीवनातील वास्तव परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रातिनिधिक काव्यसंग्रहातील कवितांचे कौतुक केले. सूत्रसंचालन रंजना बोरा, आरती डिंगोरी यांनी केले. परिचय स्वाती पाचपांडे यांनी करून दिला.
दरम्यान, कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री सुमती पवार होत्या. यात अनेक कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या.
यांचा झाला सत्कार
कविसंमेलनात कवयित्री सुमती पवार, डॉ. प्रतिभा जाधव, सुमती टापसे, वैशाली शिंदे, अलका कुलकर्णी, संयुक्ता कुलकर्णी, सीमा आडकर यांचा सत्कार करण्यात आला.