देवळा महाविद्यालयात ‘ग्रामालोक’ काव्यवाचनाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:05+5:302021-09-22T04:17:05+5:30
कोरोना नियमावलीचे पालन करत झालेल्या काव्यवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडिक, ...
कोरोना नियमावलीचे पालन करत झालेल्या काव्यवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडिक, देवीदास चौधरी, अहीराणी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.के. पाटील, शैलेश चव्हाण, रवींद्र देवरे, सोमदत्त मुंजवाडकर आदी मान्यवर कविजन उपस्थित होते. मराठी सल्लागार समिती साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. एकनाथ पगार यांनी पाहुण्यांंचे स्वागत केले. देवीदास चौधरी, लक्ष्मण महाडिक, एस.के. पाटील, शैलेश चव्हाण, रवींद्र देवरे, सोमदत्त मुंजवाडकर, उदय आहेर आदींनी आपल्या ओघवत्या शैलीत अहिराणी व मराठी कविता, चारोळ्या, गवळण आदी सादर केले. डॉ.एस.के. पाटील यांनी प्रत्यक्षात येणारे अनुभव आपल्या अहीराणी कवितेतून मांडत ग्रामीण लोकजीवनाचे यथार्थ दर्शन घडवले. लक्ष्मण महाडिक यांनी आपल्या कवितेतून राजकीय विडंबन मांडत चालू घडामोडींचा आढावा घेत श्रोत्यांचे मनोरंजन केले. डॉ. एकनाथ पगार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. डॉ. जयवंत भदाणे यांनी आभार मानले.
----------------------
देवळा महाविद्यालयात कविता सादर करताना लक्ष्मण महाडिक, व्यासपीठावर डॉ.एस.के. पाटील. डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य हितेंद्र आहेर, शैलेश चव्हाण, देवीदास चौधरी आदी मान्यवर. (२१ देवळा २)
210921\21nsk_13_21092021_13.jpg
२१ देवळा २