कोरोनाच्या वेदनांवर कवींकडून काव्यफुंकर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:20+5:302021-05-11T04:15:20+5:30
नाशिक : कोरोनामुळे आधीच हळव्या झालेल्या मनांना उभारी देण्यासाठी नाशिकच्या कवींनी कवितांच्या माध्यमातून हळुवार शब्दांची फुंकर घातली. अमाप ...
नाशिक : कोरोनामुळे आधीच हळव्या झालेल्या मनांना उभारी देण्यासाठी नाशिकच्या कवींनी कवितांच्या माध्यमातून हळुवार शब्दांची फुंकर घातली. अमाप वेदना घेऊन जगणाऱ्या माणसांच्या मनाला या कवितांनी जगण्याची ऊर्मी दिली.
डिजिटल वसंत व्याख्यानमालेत आयोजकांनी दहावे पुष्प गुंफण्यासाठी कवी संमेलनाचे आयोजन केले होते. निमित्त होते, स्व. प्रा. सुरेश मेणे यांच्या स्मृतींचे. महामारीच्या या काळात संपूर्ण लोकमानस उद्विग्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना कविता’या विषयावर कवींनी आशयघन कविता व्यक्त करून समाजाच्या भावनांना जणू वाट करून दिली. प्रा. गंगाधर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात गझलकार जयश्री वाघ यांनी ‘ही अज्ञानातून लिपी उमगते आहे, अन् काळोखाची अगम्य निर्गम भाषा’ तसेच ‘हे हात कधीचे हातातून सुटले आहे, का उगी धावती पाय घेऊनी आशा’ ही काव्ये सादर केली.
अभिनेते अजय बिरारी यांनी ‘राहू आपण सारेच दूर, नको स्पर्श, नको जवळीक’ या ओळींतून भावना व्यक्त केल्या.
शिक्षक नेते संजय चव्हाण यांनी ‘कुठं ठिगळ लावू आभाळ फाटले, आजार असा कसा हे प्रेम आटले’ या काव्यपंक्तीतून सामान्य माणसाची व्यथा बोलून दाखविली. राजेंद्र उगले यांनी देवालाच सवाल केला. ‘तुझ्यावरची भोळी श्रद्धा खोटी ठरवतो का, देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला का ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ हे काव्य सादर केले, तर पीयूष नाशिककर यांनी आपल्या कवितेतून अधोरेखित केले, ‘एकाच भडकलेल्या चितेवर धगधगणारे अनेक? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ ही कविता सादर केली. ‘या काळात इथे होम हवनाला आले नाही उधाण, पेटली नाही यज्ञकुंडे, की झाली नाही अजान. ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ असा सवाल संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गंगाधर अहिरे यांनी काव्यातून विचारला. यावेळी शंकर बोऱ्हाडे, संतोष वाटपाडे, जयश्री कुलकर्णी, संजय गोरडे आदींनी विषयानुरूप कविता सादर केल्या.
सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले, तर मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.
फोटो
१०अहिरे