‘पॉस’ने धान्य न देणाऱ्या दुकानांची होणार झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:34 AM2018-09-15T00:34:12+5:302018-09-15T00:36:37+5:30
नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत दरमहा ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने आॅनलाइन प्रणालीने रेशनमधून धान्य वितरण न करणाºया राज्यातील रेशन दुकानांची अचानक झाडाझडती करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुकानदारांकडून धान्य वितरण न करण्याचे जाणून घेण्याबरोबरच त्याची खात्री करण्यासाठी त्या त्या शिधापत्रिकाधारकांकडेही जाऊन पथकामार्फत विचारपूस केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी शहर धान्य वितरण अधिकाºयांनी दुकानदारांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्याचे वृत्त
आहे.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये रेशनमधील धान्याचे वितरण ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने केले जात असून, या प्रणालीच्या वापरामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत येणारे खरे पात्र लाभार्थी समोर येण्यास तर बोगस शिधापत्रिकाधारक ओळखण्यास मदत झाल्याचा सरकारचा दावा आहे. दरमहा पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्य वितरण करीत असताना साधारणत: २० ते २५ टक्के धान्याचे वाटप होत नसल्याने सदरचे धान्य दुकानदारांकडे शिल्लक राहत आहे. परिणामी दरमहा धान्य उचलताना दुकानदारांकडून कमी मागणी नोंदविली जात आहे.
सरकारने दरमहा शिल्लक राहणाºया धान्याचे वाटप करण्यासाठी नवीन लाभार्थ्यांचा शोध घेण्याची कार्यवाहीही सुरू केली आहे. तथापि, सहा महिने उलटूनही ‘पॉस’च्या माध्यमातून जेमतेत २५ टक्केच धान्य वितरण करणाºया दुकानदारांच्या अडचणी जाणून घेण्याच्या दृष्टीने ‘पॉस’ यंत्राचा कमी वापर करणाºया दुकानदारांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकाºयांकडे आॅनलाइन सर्वच रेशन दुकानदारांचा डाटा उपलब्ध असल्यामुळे त्यातून ‘पॉस’चा कमी वापर करणाºयांचा शोध घेऊन नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षकांच्या माध्यमातून दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. हे करताना दुकानदाराकडून ‘पॉस’यंत्राचा वापर न करण्यामागच्या कारणे जाणून घेतली जाणार आहेत.
दुकानदारांनी यापूर्वीही ‘पॉस’ यंत्राबाबत येणाºया अडचणी वेळोवळी पुरवठा विभागाच्या कानावर घातल्या असल्या तरी, थेट दुकानात जाऊनच यंत्राची तपासणी करण्याबरोबरच दुकानदार देत असलेल्या कारणांची खातरजमा करण्यासाठी त्याच्या कार्यक्षेत्रातील कार्डधारकांकडेही विचारपूस करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.