मालेगावी रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य
By admin | Published: September 20, 2015 10:44 PM2015-09-20T22:44:44+5:302015-09-20T22:47:22+5:30
मालेगावी रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य
मालेगाव कॅम्प : मालेगाव शहरात गणेशोत्सवकाळात शहराच्या मुख्य रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून, मनपा प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नसल्याने गणेशभक्तंमध्ये संताप व्यक्त होत
आहे.
मालेगावी गणेशोत्सव सुरू होण्याआधी शहरवासीयात उत्साहाचे वातावरण होते. गणेशोत्सव काळात महापालिकेने साफसफाई मोहीम, पावडर फवारणी, तसेच मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे आदि कामे करणे अपेक्षित होते; मात्र यंदा या कामांकडे महानगरपालिकेने सर्रास दुर्लक्ष केले आहे. गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी व नंतर चार दिवस उलटले तरी प्रशासन सुस्त आहे. शहरातील मुख्य रस्ता जुना आग्रारोड, कॅम्प रस्ता, सटाणारोड, संगमेश्वर, किदवाई रस्ता, नवीन बसस्थानक मार्ग, सटाणानाका. शहरातील मध्य भाग, पाच कंदील, गूळबाजारासह असंख्य रस्त्यांची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रामुख्याने आग्रारोड, कॅम्परोड, सटाणा रोड, सटाणानाका मोसम पूल चौक येथील रस्त्यावरही मोठे खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमुळे नियमित वाहतुकीत लहानमोठय़ा वाहनांना अडचणी येत आहेत. लहान मोठे अपघात होत असून आहे. वाद विवाद होत आहेत. त्यामुळे प्रसंगी वाहनांचे मोठे नुकसानही होत आहे. याच गणेशोत्सव कालावधीत हे रस्ते दुरुस्त करण्याचे धारिष्ठ अधिकार्यांनी दाखवले नाही, तर गणेश मिरवणुकीत अडचणी
निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधितांनी वेळीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)