येवल्यात पोलीस अॅक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:38 IST2021-05-18T20:32:00+5:302021-05-19T00:38:52+5:30
येवला : कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरात पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.

येवल्यात पोलीस अॅक्शन मोडवर
येवला : कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरात पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.
शहरातील विंचूर चौफुली येथे मुख्य तिन्ही रस्त्यांवर दुपारी १२ वाजेपासून पोलीस कर्मचारी तैनात होते. तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्यासह महसूल, नगरपालिका व पोलीस कर्मचारी प्रत्येक वाहनाची तपासणी करत असून, विणाकारणच फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत.
जिल्हाबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी पिंपळगाव जलाल टोल नाका येथे शहर पोलिसांनी नाकाबंदी चौकी सुरू केली असून, ई-पास नसणाऱ्या वाहनांना प्रवेश नाकारून परत पाठवले जात आहे.