वाळूमाफियांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:28 AM2018-11-28T01:28:33+5:302018-11-28T01:28:56+5:30

गोदावरी व गिरणा नदीतून वारेमाप केल्या जाणाऱ्या अवैध वाळू उपशाकडे महसूल खात्याकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले असले तरी, दिवसाढवळ्या उघडपणे चालणाºया गौणखनिजाच्या चोरीच्या विरोधात मात्र पोलीस यंत्रणेने कडक पावले उचलली आहेत.

 Police action on the sand mafia | वाळूमाफियांवर पोलिसांची कारवाई

वाळूमाफियांवर पोलिसांची कारवाई

googlenewsNext

नाशिक : गोदावरी व गिरणा नदीतून वारेमाप केल्या जाणाऱ्या अवैध वाळू उपशाकडे महसूल खात्याकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले असले तरी, दिवसाढवळ्या उघडपणे चालणाºया गौणखनिजाच्या चोरीच्या विरोधात मात्र पोलीस यंत्रणेने कडक पावले उचलली आहेत. मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वाळूचोरीचे वृत्त प्रसिद्ध होताच मालेगाव तालुक्यात वाळूचे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे. दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील वाळूची पंचक्रोशीत चर्चा होत असून, येथील वाळूची वाहतूक कोणीही अडवू शकत नाही,  असा छातीठोक दावा वाळू विक्रेत्यांकडून केला जात असल्याने वाळूची मागणी वाढली आहे.
सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी पात्रातून वाळूचा होत असलेला वारेमाप उपसा रोखण्याचे कोणतेही प्रयत्न महसूल व पोलीस खात्याकडून केले जात नसल्याचे पाहून येथील वाळूची मागणी वाढली आहे. दिवसातून शंभरेक मालट्रक वाळूची या भागातून वाहतूक होत असताना त्यासाठी कोणताही वाहतूक परवान्याची अट घालण्यात आलेली नाही. त्यातच वाळू विक्रेत्यांकडून सरसकट सिन्नर तालुक्यात कोठेही वाळूची वाहतूक करण्यात अडचण नसल्याची हमी दिली जात असल्यामुळे निर्धोेक वाहतूक केली जात आहे. दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रातूनही बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जात असताना त्याकडेही महसूल खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर मालेगावचे अपर पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने सोमवारी रात्री लेंडाणे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले आहेत. एकूणच वाळूच्या बेकायदेशीर वाहतुकीबद्दल महसूल खात्याची कारवाई दुटप्पी दिसत असून, किरकोळ वाहतूक करणाºयांना हिसका दाखविण्यासाठी सरसावणारे हात मात्र गोदावरीतील वाळू चोरी रोखण्यात थिटे पडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Police action on the sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.