डीजे लावल्यास पोलीस कारवाई करणार

By admin | Published: August 29, 2016 01:12 AM2016-08-29T01:12:10+5:302016-08-29T01:16:34+5:30

डीजे लावल्यास पोलीस कारवाई करणार

Police action will be taken against the DJ | डीजे लावल्यास पोलीस कारवाई करणार

डीजे लावल्यास पोलीस कारवाई करणार

Next

पंचवटी : म्हसरूळ परिसरात श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांनी नियमांची पायमल्ली होणार नाही हे लक्षात घेऊन शांततेत गणेशोत्सव साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी केले.
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या वतीने दिंडोरीरोडवरील यशवंत मंगल कार्यालयात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला प्रमुख नगरसेवक शालिनी पवार, रंजना भानसी, अरुण पवार, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, शंकर पिंगळे, विशाल कदम आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
मंडळातर्फे देणगी जमा करताना कोणाकडून जबरीने देणगी घेऊ नये, तसेच डीजे साउंड लावून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. जी मंडळे डीजे लावून नियमांची पायमल्ली करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी केले. या बैठकीला गणेशोत्सव मित्रमंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Police action will be taken against the DJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.