गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:35 PM2019-08-27T22:35:41+5:302019-08-27T22:36:23+5:30
घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, क्र ेनसह मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी सांगितले.
घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, क्र ेनसह मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी सांगितले.
वाडीवºहे पोलीस ठाण्यात मंगळवारी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, जागरूक नागरिक आदींची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीमती राणे बोलत होत्या. तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वांगीण प्रशिक्षित करून सतर्क करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाºया उपाययोजनांची जय्यत तयारी प्रशासनस्तरावरून करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गेल्या वर्षी उत्कृष्ठ कामगिरी करणाºया गणेश मंडळांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी सांगितले की वाडीवºहे, घोटी, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाºया प्रत्येक घटनेवर २४ तास पोलीस पथकाचे सुक्ष्म लक्ष राहणार आहे. तालुक्यात गणेशोत्सव काळामध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची विशेष कुमक तैनात ठेवली जाणार आहे.
बैठकी प्रसंगी पोलीस हवालदार सोमनाथ बोराडे, जी. एस. परदेशी, ए. आर. बोडके, बी. पी. भगत, पी. आर. मोरे, बी. डी. सोनवणे, आर. ए. शेख, आर. पी. मुळाणे, के. यु. निंबाळकर, पी. जी. भोईर, एम. एस. गाडे, दिलीप चौधरी, पिंपळदचे सरपंच कड आदींसह विविध गावातील गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाचे नियम
गणेश मंडळांना आॅनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. गणेश उत्सवाचे मंडप न्यायालयाच्या नियमानुसार असायला हवे, मंडपासाठी रस्ता रु ंदीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त जागा वापरू नये रस्त्यावरील वाहतुकीच्या दिशेनेच मंडपाचे प्रवेशद्वार असावे, सिग्नल आणि चौकाच्या १०० फूट अंतरामध्ये कोणताही मंडप उभारू नये, ध्वनी प्रदूषणाचे कसोशीने पालन करावे, मंडळांची आॅनलाईन नोंदणी करावी, ज्यामुळे पोलिसांना सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, रस्त्यावर, मंडपाजवळ गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. उत्सव काळात नागरिकांना अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले.