पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत नाशिक पोलीस सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:46 PM2018-03-08T22:46:35+5:302018-03-08T22:46:35+5:30

देशभरात दोन दिवसांत चार पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्यांची सुरक्षीतता करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.

Police alert for the safety of the statues | पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत नाशिक पोलीस सतर्क

पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत नाशिक पोलीस सतर्क

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिस गस्त पथकाला पुतळ्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश पुतळ्यांबाबतही शहर पोलीस यंत्रणा सतर्क

नाशिक : देशभरात विविध महापुरूषांच्या पुतळ्यांची होत असलेली विटंबना लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये सर्व राज्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिकमधील पोलीस यंत्रणाही या पार्श्वभूमीवर सतर्क असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील पोलिस गस्त पथकाला पुतळ्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दिले आहे.
देशभरात दोन दिवसांत चार पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्यांची सुरक्षीतता करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानुसार नाशिक शहरातील पुतळ्यांबाबतही शहर पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले. शहरात शांततेचे वातावरण असल्याने अनुचीत प्रकार घडले नाहीत. तसेच खबरदारी म्हणून शहरातील सर्व पुतळ्यांभोवती गस्त घातली जाणार आहे.

Web Title: Police alert for the safety of the statues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.