शहरातील १६४ भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:15 AM2018-05-08T01:15:39+5:302018-05-08T01:16:28+5:30

शहरातील उड्डाणपुलाखाली, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यांवर भिकाºयांची संख्या गत काही दिवसांत चांगलीच वाढली होती़ एकाच ठिकाणी राहून तिथेच सर्व विधी उरकून शहराच्या अस्वच्छतेत भर घालणाºया तसेच वाहनधारक व नागरिकांकडून भीक मागणारे, पैसे न दिल्यास गाडीस नुकसान पोहोचविणाºयांविरोधात कारवाई करण्याची विनंती महिला व बालकल्याण विभागाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे केली होती़

 Police arrested 164 beggars from the city | शहरातील १६४ भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

शहरातील १६४ भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

Next

नाशिक : शहरातील उड्डाणपुलाखाली, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यांवर भिकाºयांची संख्या गत काही दिवसांत चांगलीच वाढली होती़ एकाच ठिकाणी राहून तिथेच सर्व विधी उरकून शहराच्या अस्वच्छतेत भर घालणाºया तसेच वाहनधारक व नागरिकांकडून भीक मागणारे, पैसे न दिल्यास गाडीस नुकसान पोहोचविणाºयांविरोधात कारवाई करण्याची विनंती महिला व बालकल्याण विभागाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे केली होती़ न्यायाधीश शिंदे यांनी शहर पोलीस आयुक्तांना दिलेल्या आदेशानुसार सोमवारी (दि़ ७) शहरात भिक्षेकरीमुक्त अभियान राबविण्यात आले़  संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीतून १६४ भिक्षेकºयांना पकडून पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अहमदनगर, पुणे, नाशिक व मनमाड याठिकाणच्या पुनर्वसन केंद्रात रवाना केले़ शहर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी भिक्षा प्रतिबंधक अधिनियम १९५९ अन्वये शहरातील विविध सिग्नल्स, उड्डाणपूल, रस्ते या ठिकाणी सोमवारी विशेष मोहीम राबविली़ या विशेष मोहिमेसाठी दोन पोलीस अधिकारी व दहा कर्मचारी असलेल्या प्रत्येकी सहा टीम व बारा वाहने देण्यात आली होती़ पोलिसांनी शहरातील १६४ भिक्षेकºयांना पकडून पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये आणले़ पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी या भिक्षेकºयांची अंघोळ, केशकर्तन, नवीन कपडे व जेवणाची व्यवस्था केली होती़  भिक्षेकऱ्यांची मुलाची स्वच्छता तसेच नवीन कपडे घातल्यानंतर तर ती भिक्षेकºयांची मुलेच नसल्याचे चित्र दिसत होते़ यानंतर या सर्व भिकाºयांना जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यवान डोके यांच्यासमोर हजर करण्यात  आले़  पोलिसांनी पकडलेल्या या भिकाºयांची पुरुष, महिला, मुले, मुली अशी विभागणी करून पुनर्वसनासाठी पुरुषांना अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील गव्हर्नमेंट मेल रिसिंग सेंटर, महिलांना पुणे येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र तर मुले व मुलींना अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह मनमाड व मालेगाव या ठिकाणी पाठविण्यात आले़
भिक्षेकयांच्या अजब-गजब गोष्टी़
कॉलेजरोड परिसरात एक वृद्ध भिकारी होता़ नागरिकांनी दिलेले सुटे पैसे तो सायंकाळी याच परिसरातील स्वीट्स मालकाकडे ठेवण्यासाठी देत असे़ या स्वीट्स दुकानाचा मालकही या भिकाºयाचे पैसे एका बाजूला ठेवून देत असे़ काही वर्षांनी या भिकाºयाचे निधन झाल्यानंतर स्वीट्स मालकाने रक्कम मोजली असता त्यालाही आश्चर्य वाटले़ या भिकाºयाचे तब्बल नऊ लाख रुपयांचे सुटे पैसे जमा झाले होते़ या स्वीट्स दुकानाच्या मालकाने या भिकाºयाची संपूर्ण रक्कम ही स्वयंसेवी संस्थांना दान केली़
टिळकवाडी सिग्नलवर नाशिककरांना एक हात व पाय अर्धवट असलेला एक भिकारी उन्हा-तान्हात नेहमी भीक मागताना दिसतो़ त्याच्या शरीराकडे पाहून नागरिकांना दया येते व पैसेही देतात़ मात्र, या भिक्षेकºयाची अजब तºहा ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही़ या भिक्षेकºयाने आपले व्यसन अर्थात विडी पिण्यासाठी चक्क दोनशे रुपये रोजाने एका महिलेचे नेमणूक केली आहे़ विडी पेटवून देण्यासाठी या महिलेला हे पैसे दिले जातात़

Web Title:  Police arrested 164 beggars from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.