वडाळा गावातून तलवार बाळगणाऱ्यास पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:29 PM2019-03-18T18:29:17+5:302019-03-18T18:30:37+5:30
वडाळागाव परिसरात बेकायदेशीररीत्या तलवार विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना पोलिसांना आढळून आलेल्या एका संशयितावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे. इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान हा गुन्हा उघडकीस आला.
नाशिक : वडाळागाव परिसरात बेकायदेशीररीत्या तलवार विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना पोलिसांना आढळून आलेल्या एका संशयितावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे. इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान हा गुन्हा उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलिसांनी वडाळागाव इंदिरानगर भागात शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान वडाळागावातील गणेशनगर येथील विशाल बबन वानखेडे (२३) हा परिसरातील भेंडीवालाबाबा दर्गा येथील मैदानावर त्याच्या ताब्यात असलेली तलवार विक्रीकरता जवळ बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून २७ इंच लांब इंच पात्याची ६ इंच लांब व सव्वा इंच रुंदीची पितळी मूठ असलेली तलवार २९ इंचाच्या म्यानात निळ्या रंगाच्या जुन्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी सदर शस्त्र जप्त करून विशाल वानखेडे याला अटक केली. त्याच्यावर शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.