लाचेची रक्कम घेताना पोलीस ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:18 PM2021-03-01T23:18:32+5:302021-03-02T02:23:05+5:30
नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या अभोणा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार संशयित परशराम लक्ष्मण गांगोडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

अभोणा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फिर्यादी व अन्य आरोपीतांना अटक करून त्यांना जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी संशयित गांगोडे याने तक्रारदाराकडे २० हजारांची लाच मागितली. तडजोडअंती पंधरा हजाराची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने गांगोडे यांना अटक केली. ते ज्या पोलीस ठाण्यात कर्तव्यावर नियुक्त होते, त्याच अभोणा पोलीस ठाण्यात संशयित लाचखोर हवालदाराविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.