येवल्यात कोरोना संशयिताबाबत पोलिसात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:45 AM2020-03-21T00:45:23+5:302020-03-21T00:46:34+5:30
येवला शहरात सौदी अरेबियातून आलेल्या एका इसमात कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्याने परिसरातील नागरिकांनी या संशयिताच्या वैद्यकीय चाचण्या होऊन उपचार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनीही याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे पत्र पाठविले आहे.
येवला : शहरात सौदी अरेबियातून आलेल्या एका इसमात कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्याने परिसरातील नागरिकांनी या संशयिताच्या वैद्यकीय चाचण्या होऊन उपचार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनीही याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे पत्र पाठविले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला शहरात राहणारा एक इसम ८ ते १० दिवसांपूर्वी सौदी अरेबियातून आला असून, त्याने भारतात परत आल्यानंतर कोरोना सदृश आजाराचे लक्षण दिसून आल्याने दि. १५ ते १९ मार्च या कालावधीत लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार घेतल्याची माहिती काही नागरिकांनी त्यांचे नाव-गाव न सांगण्याच्या अटीवर पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाकडून माहिती घेतली असता सदर इसमास श्वसनाचा त्रास असल्याचे आणि त्यांना डिस्चार्ज दिल्याचे सांगण्यात आले.