महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी चालकांना पोलीसांचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 04:12 PM2020-09-27T16:12:59+5:302020-09-27T16:14:06+5:30
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळुन वाहन चालवल्यास नक्कीच अपघाताच्या प्रमाणात घट होईल असे प्रतिपादन महामार्ग पोलीस टॅबचे सहायक निरीक्षक अमोल वालझाडे यांनी केले.
लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळुन वाहन चालवल्यास नक्कीच अपघाताच्या प्रमाणात घट होईल असे प्रतिपादन महामार्ग पोलीस टॅबचे सहायक निरीक्षक अमोल वालझाडे यांनी केले.
अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक विजय पाटील ( मुख्यालय), दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टॅब येथे वाहन चालकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
मुंबई नाशिक एक्सप्रेसवे लिमिटेड व महामार्ग क्र मांक ३ यांच्या संयुक्त विद्यमाने अपघाताचे प्रमाण कसे कमी करण्यात येईल याचे प्रात्यक्षिक करून कार चालक, ट्रक चालक, मोटरसायकल, अवजड वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना प्रबोधन करण्यात आले.
यावेळी सीटबेल्ट लावणे, लाईिनग किटंग, भरधाव वेग, हेल्मेट वापरणे, रात्रीच्या वेळी वाहने पार्किंग मध्ये लावणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता वाहन चालवणे. इत्यादी बाबत जनजागृती केली. त्याचप्रमाणे रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात येऊन वाहन चालकांना माहीती पत्रके वाटण्यात आली.
त्याचप्रमाणें या वर्षी २०२० मध्ये १९ हजार बेकायदेशीर वाहतूक करणाºया चालकांवर व वाहनांवर कारवाई करून सुमारे ३६ लाख रु पयांचा दंड वसूल करण्यात आला.
गेल्या दहा वर्षेमध्ये सर्वात जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वाहन चालकांना मार्गदर्शन करताना महामार्ग इगतपुरी - घोटी टॅबचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस उपनिरीक्षक बी. पी. कुलकर्णी, सूर्यकांत पाटील, दीपक दिंडे, रामभाऊ बागल, नितीन दराडे, अर्जुन निंबेकर, संतोष मालोडे, जीवन आहेर, जितेंद्र पाटोळे, उमेश खालकर त्याचप्रमाणे घोटी टोलनाक्याचे प्रोजेक्ट मॅनेजर राकेश ठाकूर, पेट्रोलिंग अधिकारी रवी देहाडे, अजय जगताप आदि उपस्थित होते.