हळदीला वाजविले वाद्य अन् मांडवात धडकले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:34 AM2021-11-17T01:34:05+5:302021-11-17T01:34:26+5:30

शुभमंगलच्या पूर्वसंध्येला ढोल-ताशांच्या गजरात रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमाला अचानकपणे पोलीस येऊन धडकले अन् लग्नघरी पडलेल्या मांडवात एकच सन्नाटा पसरला. विनापरवानगी वाद्य वाजवून गर्दी जमवत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी वाजंत्रीवादकांसह नवरदेव आणि वरपित्यांस पोलीस ठाण्यात आणले.

Police beat turmeric instrument in the mandapa | हळदीला वाजविले वाद्य अन् मांडवात धडकले पोलीस

हळदीला वाजविले वाद्य अन् मांडवात धडकले पोलीस

googlenewsNext
ठळक मुद्देढोल-ताशा जप्त : विनापरवानगी वाद्य वाजविल्याप्रकरणी नवरदेवासह पित्याविरुद्ध गुन्हा

नाशिक : शुभमंगलच्या पूर्वसंध्येला ढोल-ताशांच्या गजरात रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमाला अचानकपणे पोलीस येऊन धडकले अन् लग्नघरी पडलेल्या मांडवात एकच सन्नाटा पसरला. विनापरवानगी वाद्य वाजवून गर्दी जमवत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी वाजंत्रीवादकांसह नवरदेव आणि वरपित्यांस पोलीस ठाण्यात आणले.

गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर मल्हारखाण झोपडपट्टीमध्ये जोरजोरात ढोल व ताशा ही पारंपरिक वाद्ये बडवली जात होती. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीही जमली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव हे त्यांच्या पथकासह मल्हारखाण झोपडपट्टीत दाखल झाले. अचानकपणे पोलीस वाहनाचा सायरन कानी येताच लग्नघरी पडलेल्या मांडवात शांतता पसरली. पोलिसांनी नवरदेव प्रसाद संतोष बुकाने याच्याकडे वाद्ये वाजविण्याच्या परवानगीबाबत विचारणा केली असता, बुकाने यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. प्रसाद यांच्या हळदीचा कार्यक्रम याठिकाणी सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली होती, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ वाद्य वाजविणारे तसेच नवरदेवासह वरपित्यास पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांना समज देत विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन करून कोविड-१९ बाबतच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याने प्रसाद संतोष बुकाने त्याचे वडील संतोष बुकाने व वाद्य वाजविणारे सहा जण यांच्याविरुद्ध भादंवि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Police beat turmeric instrument in the mandapa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.