पालकमंत्र्यांसह पोलीसांची दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 09:14 PM2017-08-16T21:14:32+5:302017-08-16T21:21:05+5:30
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १११ शहर वाहतूक पोलिसांना पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते एकसमान हेल्मेट वाटप करण्यात आले
नाशिक : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १११ शहर वाहतूक पोलिसांना पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते एकसमान हेल्मेट वाटप करण्यात आले. दरम्यान, शहरातून मंत्र्यांसह पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी हेल्मेट परिधान करत जनजागृतीपर दुचाकी फेरी काढली.
मागील काही महिन्यांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी आणि नागरिकांना दुचाकी चालविताना हेल्मेटची सवय व्हावी, जेणेकरुन अपघातात जीव जाणार नाही, यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हेल्मेट न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाईसोबत जनप्रबोधन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. याचा प्रभाव नागरिकांमध्येही दिसू लागला आहे. बहुतांश नाशिककर दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. विना हेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून वाहतुक नियंत्रण शाखेने लाखोंचा दंड वसूल केला आहे. नागरिकांनी दंडात्मक कारवाई व अपघातात डोक्याला लागणारा गंभीर मार टाळण्यासाठी स्वत:च्या सुरक्षेचा विचार करुन हेल्मेटचा वापर करावा, या उद्देशाने जनजागृती दुचाकी फे री काढण्यात आली. यामध्ये अग्रभागी महाजन, सिंगल हे स्वत: हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवित होते.