पोलिसांचा नाकाबंदीचा अट्टाहास कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:10 AM2017-08-22T00:10:35+5:302017-08-22T00:10:35+5:30
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील कळसकरनगर चौफुली या एकाच ठिकाणी पोलिसांकडून दररोज तीन ते चार तास नाकाबंदी केली जात असून, यामध्ये वाहनांची कागदपत्रं तपासणीच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्याची मोठी हद्द असताना केवळ एकाच ठिकाणी नाकाबंदीचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल निर्माण झाला आहे, तर कारवाईच्या नावाखाली अव्वाच्या सवा विनापावती दंडवसुलीची तक्रार काही स्थानिक वाहनधारकांनी केल्या आहेत़
पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील कळसकरनगर चौफुली या एकाच ठिकाणी पोलिसांकडून दररोज तीन ते चार तास नाकाबंदी केली जात असून, यामध्ये वाहनांची कागदपत्रं तपासणीच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्याची मोठी हद्द असताना केवळ एकाच ठिकाणी नाकाबंदीचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल निर्माण झाला आहे, तर कारवाईच्या नावाखाली अव्वाच्या सवा विनापावती दंडवसुलीची तक्रार काही स्थानिक वाहनधारकांनी केल्या आहेत़ पंचवटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून १ जानेवारीपासून म्हसरूळ पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलीस ठाणे हद्दीत आरटीओ परिसर, मखमलाबाद, म्हसरूळ यांसह मोठा परिसराचा समावेश असूनही पोलीस ठाण्याच्या निर्मितीपासून केवळ एकाच ठिकाणी नियमितपणे नाकाबंदी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मेरीकडून रासबिहारी शाळेकडे व रासबिहारी शाळेकडून मेरीकडे जाणाºया वाहनांची नेहमी वर्दळ असते़ या नाकाबंदीसाठी एक चारचाकी वाहन, चार ते पाच पोलीस कर्मचारी व मदतीला वाहतूक शाखेचे दोन-तीन कर्मचारी तैनात असतात. नाकाबंदीमध्ये वाहनतपासणी गरजेची असताना पोलीस कर्मचारी वाहने अडवून केवळ ‘ऐन्ट्री’वसुली करताना दिसतात़ म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत वाहतुकीसाठी केवळ एकच रस्ता नाही़ मात्र पोलिसांना कळसकरनगर चौफुलीवरील नाकाबंदीतच रस का? नाकाबंदीच्या नावाखाली वसूल केला जाणारा महसूल शासनाच्या तिजोरीत जातो की आणखी कुठे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे़ या चौफुलीवर पोलीस आयुक्तवा पोलीस उपआयुक्तयांनी कळसकरनगर चौफुलीला भेट देऊन नाकाबंदीच्या कामाचे निरीक्षण करण्याची मागणीही केली जात आहे़