पोलीसाच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केले लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 02:58 PM2018-11-03T14:58:23+5:302018-11-03T15:00:48+5:30

नाशिक : पोलीस दलाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ...

Police Child Sexual Harassment | पोलीसाच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केले लैंगिक अत्याचार

पोलीसाच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केले लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्देवीष पाजून जीवे ठार मारण्याची धमकीसंशयित भूषण हा शहराच्या हद्दीतून पसार झाला भूषणविरुध्द बलात्कार, जबरी लूटीचा गुन्हा दाखल

नाशिक : पोलीस दलाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पूत्राने युवतीला बहाण्याने बोलावून लूटमार करत वीष पाजून जीवे ठार मारण्याची धमकी देत शारिरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.
याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस मुख्यालयाच्या वसाहतीत गंगापूररोड येथे राहणारा संशयित आरोपी भूषण नानासाहेब जाधव याने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिडित युवतीला लग्नासाठी कागदपत्रे घेऊन कॉलेजरोड येथे बोलावले. युवती आली असता भूषण याने ‘कागदपत्रे का आणली नाहीत’ असे सांगून शिवीगाळ करत मारहाण क रण्यास सुरूवात केली. पिडितेला ‘मी डॉक्टरकडे घेऊन जातो’ असे तिच्यासोबत आलेल्या मैत्रिणीला सांगून आडगाव शिवारातील निर्मलनगर येथे घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निर्मलनगरमध्ये पिडित युवतीला रात्रभर डांबून ठेवत मारहाण केली तसेच वीष पाजून जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने तिच्यावर शारिरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचे पिडित युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. संशयित भूषण याने पिडितेचा मोबाईल, पैसे हिसकावून घेत पोबारा केला आहे. पिडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी संशयित भूषणविरुध्द बलात्कार, जबरी लूटीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास महिला उपनिरिक्षक पाटील करीत आहेत.
---इन्फो--
संशयित फरार; शोध सुरू
घटनेनंतर संशयित भूषण हा शहराच्या हद्दीतून पसार झाला आहे. महिला उपनिरिक्षक पाटील यांच्यासह पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस मुख्यालय वसाहतीत त्याच्या राहत्या घरी तपासणी केली; मात्र तो घरी आढळून आला नाही. दरम्यान, तपासणी अंमलदार पाटील यांनी त्याच्या वडिलांकडे विचारपूस करीत त्याच्या काही मित्रांकडेही चौकशी केली आहे. लवकरच संशयित भूषणला ताब्यात घेण्यात येईल त्यादृष्टीने शोध सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले

Web Title: Police Child Sexual Harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.