पोलीस कोरोना योद्ध्यांच्या वारसांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 09:47 PM2020-10-10T21:47:21+5:302020-10-11T00:46:23+5:30
नाशिक : गेल्या सहा महिन्यांपासून शहर-ग्रामीण पोलीस दल कोरोनाशी समोरासमोर लढा देत आहेत. आपले कर्तव्य बजावताना कोरोनाशी सामना पोलिसांना करावा लागत आहे. शहर पोलीस आयुक्तालयाने सहा तर ग्रामीण पोलीस दलाने आतापर्यंत आपल्या सात योध्यांना गमावले आहे. आतापर्यंत एकूण १३ पैकी ७ वारसदारांना शासनाच्या ५० लाख रु पयांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे.

कोरोनाशी दोन हात करताना पोलिसांकडून सर्वतोपरी सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. नुकतेच शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस कोविड केअर सेंटरदेखील सुरु करण्यात आले आहे, जेणेकरून पोलिसांना वेळेवर आणि चांगल्याप्रकारे वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल. दरम्यान शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने आतापर्यंत बळी घेतला आहे. तसेच ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. असे एकूण जिल्ह्यात तेरा पोलीस कर्मचाºयांचा आतापर्यंत बळी गेला आहे. कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडणाºया आरोग्य, पोलीस दलातील योद्ध्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांच्या विम्याचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली आहे. यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील आतापर्यंत तिघा योद्ध्यांच्या वारसांना विम्याची रक्कम मिळाली असून चौथा प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आला असून लवकरच त्यांची रक्कम आयुक्तालायकडे प्राप्त होणार आहे. उर्वरित दोन प्रस्तावांवर आतापर्यंत स्वाक्षरी झालेली नाहीत. तसेच अलीकडे निधन झालेल्या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांची सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जात असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. तसेच ग्रामीण पोलीस दलातील एकूण ७ पोलीस कर्मचाºयांपैकी ४ वारसदारांना विम्याचा रकमेचा लाभ झाला असून उर्विरत तीन प्रस्ताव मंजुरीकरिता ठेवण्यात आले आहेत.