आयुक्तालय क्रीडा स्पर्धेत पोलीस आयुक्तालयाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 09:54 PM2018-08-17T21:54:20+5:302018-08-17T21:55:13+5:30
नाशिक : शहर पोलीस मुख्यालय मैदानावर सुरू असलेल्या २७ व्या आयुक्तालय क्र ीडा स्पर्धेत शुक्रवारी (दि़१७) पोलीस आयुक्तालय संघाने फुटबॉल, हॅण्डबॉल, महिला हॉलीबॉल तसेच पाच हजार मीटर धाव पुरुष स्पर्धेत वर्चस्व मिळविले़ त्यामध्ये पाच हजार मीटर धाव पुरूष गटात संतोष बुचडे (वेळ १७.५८.१०) आणि ललीत सपकाळे (१८.०६.९१) यांनी सर्वोत्कृष्ट वेळेची नोंद केली आहे़
नाशिक : शहर पोलीस मुख्यालय मैदानावर सुरू असलेल्या २७ व्या आयुक्तालय क्र ीडा स्पर्धेत शुक्रवारी (दि़१७) पोलीस आयुक्तालय संघाने फुटबॉल, हॅण्डबॉल, महिला हॉलीबॉल तसेच पाच हजार मीटर धाव पुरुष स्पर्धेत वर्चस्व मिळविले़ त्यामध्ये पाच हजार मीटर धाव पुरूष गटात संतोष बुचडे (वेळ १७.५८.१०) आणि ललीत सपकाळे (१८.०६.९१) यांनी सर्वोत्कृष्ट वेळेची नोंद केली आहे़
मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत क्रिडा प्रकारानुसार विजयी संघ : पाच हजार मीटर धाव - पुरूष संतोष बुचडे,ललीत सपकाळे तर महिला गटात परिमंडळ १ च्या मंजू सहाणी,मुख्यालयाच्या पुष्पा कहांडोेळे लांब उडी महिला गटात मुख्यालयाच्या राजश्री शिंदे आणि पुष्पा कांदळे पुरूष गटात मुख्यालयाचे नितीन जगताप परिमंडळ १ चे जयलाल राठोड,तिहेरी उडी पुरूष गटात आयुक्तालयाचे दीपक देसले आणि मुख्यालयाचे नितीन जगताप,उंच उडी पुरूष गटात मुख्यालयाचे ऋषीकेश उगले,परिमंडळ १ चे जयलाल राठोड,महिला गटात परिमंडळ १ च्या मनिषा ताजनपुरे आणि मुख्यालयाच्या पुष्पा कहांडोळे, ८०० मिटर धाव पुरूष गटात मुख्यालयाचे संतोष बुचडे आणि आयुक्तालयाचे सागर कोळी,१०० मिटर हार्डल्स महिला गटात परिमंडळ १ च्या साधना गडाख आणि शितल गवळी, पुरूष गटात आयुक्तालयाच्या भुषण अनवट व मुख्यालयाचे विशाल वाजे, ४०० मिटर हार्डल्स स्पर्धेत महिला गटात आयुक्तालयाच्या ललीता पवार व मुख्यालयाच्या पुजा कुमावत पुरूष गटात मुख्यालयाचे नितीन पवार आणि आयुक्तालयाचे भुषण अनवट हॉकी आणि खो खो स्पर्धेत पुरूष गटात परिमंडळ २ चा सघांने बाजी मारली. फुटबॉलच्या अंतिम सामन्यात पोलिस मुख्यालय हॉलिबॉल मध्ये परिमंडळ १ हॅण्डबॉलमध्ये आयुक्तालय कब्बडी पुरूष गटात परिमंडळ २ हॉलिबॉल महिला गटात आयुक्तालय कब्बडी महिला गटात मुख्यालय याप्रमाणे संघ विजयी झाले.
रिले स्पर्धेत ४ बाय ४०० महिला गटात मुख्यालयाच्या अंजली सहाणे आणि राधिका कुमावत,पुष्पा कहांडोळे तसेच परिमंडळ १ ची मंजू सहानी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांकावर परिमंडळ १ ची प्रियंका झाल्टे,साधना गडाख,आयुक्तालयाच्या ललिता पवार आणि मुख्यालयाच्या कोमल यादव यांनी दावा ठोकला. पुरूष गटात मुख्यालयाचे संतोष बुचडे आणि आयुक्तालयाचे भुषण अनवट,दिनेश माळी,सागर कोळी,यानी प्रथम आणि वैभव दांंडगे,दिपक देसले,योगेश सपकाळे, कैलास झाडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. इतर क्रिडा प्रकारापैकी खोखो पुरूष गटात परिमंडळ १ बॉस्केटबॉल पुरूष गटात पोलिस मुख्यालय,खोखो महिला गटात पोलिस आयुक्त कार्यालय बॉस्केटबॉल महिला गटात मुख्यालय या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर वेट लिप्टींग महिला गटात वजन गटानुसार राजश्री शिंदे,निशा भालेराव पुजा कुमावत,मोनाली ठाकरे,भाग्यश्री कापडणीस,माधूरी जगताप,सोनाली काठे,सोनाली बुचकुल,शितल पानसरे,सुनिता साबळे यांनी प्रथम व द्वितीय तर ७५ किलोहून अधिक वजन गटात मिनाक्षी तोंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वेटलिफ्टीग पुरूष गटात वजन गटानुसार संदिप निकम,पवन पगारे,नितीन जगताप,चारूदत्त निकम,विशाल वाजे.भुषण अनवट,अंकुष सोनजे,सुदाम धवळे,राम बर्डे,गौरव गवळी,वैभव परदेशी,किरण घोडके,सतीष धनगर,योगेश माळी,मयुर पवार,गिरीष महाले यांनी आपआपल्या वजन गटात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले तर १०९ किलो वजन गटात योगेश वायकंडे आणि १०९ किलोहून अधिक गटात नितेश गायकवाड हे अंतिम विजयी ठरले.
बॉक्सिंग पुरूष गटात वजन गटानुसार संदिप निकम,मयुर सिंग,पवन पगारे,नितीन जगताप,दिनेश निमजे,राकेश बहिरम,रमेश गोसावी,अमोल टिळेकर,गिरीष महाजन,योगेश वायतंडे हे विजयी झाले. महिला गटात वजन गटानुसार सोनाली गुंजाळ,नेहा खोब्रागडे,शामला जोशी,आम्रपाली पगारे,उन्नती भावे,अश्विनी भोसले,दिपाली कडाळे,सुनिता साबळे,मिनाक्षी तोंडे या विजयी झाल्या.