पोलिसांकडून ८४६ नागरिकांवर कारवाईचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:26 AM2020-07-02T00:26:05+5:302020-07-02T00:32:19+5:30
शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचे संक्र मण वेगाने सुरू आहे. बुधवारी (दि.१) शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात ‘‘मिशन बिगिन अगेन’’ अंतर्गत प्रभावीपणे जमावबंदी, संचारबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे ८४६ इसमांवर पोलिसांनी दिवसभरात कारवाईचा बडगा उगारला.
नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचे संक्र मण वेगाने सुरू आहे. बुधवारी (दि.१) शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात ‘‘मिशन बिगिन अगेन’’ अंतर्गत प्रभावीपणे जमावबंदी, संचारबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे ८४६ इसमांवर पोलिसांनी दिवसभरात कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीवर एकापेक्षा अधिक प्रवास करणारे, मास्क न वापरणारे तसेच ‘डिस्टन्स’ न बाळगणाºया बेजबाबदार लोकांचा समावेश आहे. गुरुवारपासून कारवाई अधिक तीव्र होणार आहे.
४बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सूचना देण्यात आल्या. यावेळी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना तत्काळ मार्गस्थ करून देण्यात आले; मात्र विनाकारण रस्त्यावर प्रवास करण्यासाठी उतरलेल्या दुचाकीचालकांचे समुपदेशन करून ताकीद देत सोडण्यात आले; ज्या दुचाकीचालकांनी मास्क परिधान केलेला नव्हता किंवा एकापेक्षा अधिक प्रवासी बसविलेले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
४महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ जरी सुरू असले तरीदेखील लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला गेला आहे.
४पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या घोषणेनंतर जिल्हाधिकाºयांनी प्रभावी जमावबंदी व संचारबंदी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आदेश पारित केले आहे.