नाशिकमध्ये हॉस्पिटल विरोधातील 'अर्धनग्न' आंदोलकांना पोलिसांनी उचलले; विरोधात लोक जमले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:45 PM2021-05-25T21:45:04+5:302021-05-25T21:45:58+5:30

कोरोना संकटात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचे प्रकार अजूनही काही थांबताना दिसत नाहीत.

police custody aap leader outside hospital People gathered in protest in Nashik | नाशिकमध्ये हॉस्पिटल विरोधातील 'अर्धनग्न' आंदोलकांना पोलिसांनी उचलले; विरोधात लोक जमले

नाशिकमध्ये हॉस्पिटल विरोधातील 'अर्धनग्न' आंदोलकांना पोलिसांनी उचलले; विरोधात लोक जमले

Next

नाशिक : खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णावर उपचारासाठी अव्वाच्या सव्वा दराने रक्कम आकारली जात असल्याने एका रुगणलयात आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सोबत घेत रुग्णालयामध्ये 'कपडे काढो' गांधीगिरी करत ठिय्या दिला. या गांधीगिरी चे फेसबुक लाईव्ह करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये कार्पोरेट रुग्णालयांच्या अमानवी वागणुकीविषयी तीव्र संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी भावे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले असता मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने लोक जमले आहेत.

कोरोना उपचाराचं भरमसाठ बिल, नाशिकमध्ये रुग्णालयाबाहेर अंगावरील कपडे काढून अनोखं आंदोलन; Video व्हायरल


कोरोना संकटात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचे प्रकार अजूनही काही थांबताना दिसत नाहीत. खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णावर उपचारासाठी अव्वाच्या सव्वा दराने रक्कम आकारली जात असल्याने नाशिकमधील एका रुग्णालयात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनासोबत घेत रुग्णालयामध्ये 'कपडे काढो' आंदोलन करत ठिय्या दिला. या गांधीगिरीचे फेसबुक लाईव्ह करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये खासगी रुग्णालयांच्या अमानवी वागणुकीविषयी तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 



दरम्यान, पोलिसांनी भावे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले असता मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. पोलिसांनी भावे यांना गेल्या तीन तासांपासून पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं असून त्यांच्यावर अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. पण व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानं पोलीस ठाण्याबाहेर खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात संतप्त नागरिकांनी गर्दी केली आहे. 
 

Web Title: police custody aap leader outside hospital People gathered in protest in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.