वाघ खून प्रकरणी दोघांना चार दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:51 PM2020-03-06T23:51:52+5:302020-03-06T23:53:09+5:30
सहा दिवसांपूर्वी मोकळ्या जागेत झालेल्या अट्टल घरफोड्या प्रशांत वाघ याच्या खूनप्रकरणी मयत प्रशांतचाच दाजी व त्याचा मित्र अशा दोघा संशयितांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नाशिकरोड : सहा दिवसांपूर्वी मोकळ्या जागेत झालेल्या अट्टल घरफोड्या प्रशांत वाघ याच्या खूनप्रकरणी मयत प्रशांतचाच दाजी व त्याचा मित्र अशा दोघा संशयितांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
जयभवानीरोड श्री तुळजाभवानी मंदिराशेजारी मोकळ्या जागेत गेल्या शनिवारी सकाळी अट्टल घरफोड्या करणारा प्रशांत शांतीलाल वाघ याचा धारदार शस्त्राने वार करून डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून उपनगर पोलीस व क्र ाईम ब्रँचचे सर्व युनिट या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात सर्वतोपरी प्रयत्न करत होते. वरिष्ठ पोलीस दिनेश बरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, श्यामराव भोसले, युवराज पाटील, श्रीराम सपकाळ, संजय ताजणे, देवकिसन गायकर, अन्सार सय्यद, जयेश शिंदे यांनी मयत प्रशांत याच्या सर्व सहकाऱ्यांची कसून चौकशी केली. यामध्ये प्रशांत हा नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करीत असल्याने ती नेहमी भांडण झाल्यानंतर गोरेवाडी येथे राहणाºया नणंदकडे जात असे. गेल्या गुरु वारी पुन्हा प्रशांत याचे पत्नीसोबत भांडण झाल्याने ती बाहेर निघून गेली होती. प्रशांतने गोरेवाडी येथे बहीण अश्विनीच्या घरी जाऊन माझी पत्नी कुठे आहे, अशी विचारणा करत शिवीगाळ करून दमदाटी केली. तुम्हीच माझ्या पत्नीला लपवले आहे, असे म्हणत तुमच्या मुलांना किडन्याप करून मारून टाकेल, असा दम दिला. मुलांच्या भीतीपोटी मयत प्रशांतचा दाजी दीपक जराप्पा पुजारी (रा. गोरेवाडी), रिक्षाचालक मनोज किसन शार्दुल (रा.फर्नांडीसवाडी) यांनी प्रशांत वाघ याचा धारदार शस्त्राने वार करून तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे.
खून प्रकरणातील संशयित दीपक जराप्पा पुजारी व मनोज किसन शार्दुल यांना
गुरु वारी दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता ९ मार्चपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.