पोलिसांचा ‘डिकॉय’ : महिलांची मध्यरात्री छेड काढणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 06:15 PM2019-12-24T18:15:54+5:302019-12-24T18:18:27+5:30

देशभरात महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलावर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ लागले. महिलांमधील भय कमी करण्यासाठी आणि रात्रीदेखील महिलांच्या मदतीला पोलीस सज्ज...

Police 'decoy': Bumpers stabbing women at midnight | पोलिसांचा ‘डिकॉय’ : महिलांची मध्यरात्री छेड काढणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

पोलिसांचा ‘डिकॉय’ : महिलांची मध्यरात्री छेड काढणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांना एकटे बघून रात्री अश्लील हावभाव पोलिसांनी त्यांचे चित्रीकरण पोलिसांनी ‘डिकॉय’ आखला.

नाशिक :  महिलांना रात्रीच्या वेळी एकटे बघून छेड काढण्याचा व अंगलट करण्याचा प्रयत्न करणा-या विकृत व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी खास ‘डिकॉय’ राबविण्याचे आदेश देत शहरात तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सापळा लावला. यावेळी साध्या वेशातील महिलांना सर्वसामान्य समजून एकटे बघून रात्रीच्या अंधारात अश्लील हावभाव करत छेडणा-याना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांचे अश्लील वर्तन कॅमे-याद्वारे 'स्टिंग' करून पुरावा म्हणून पोलिसांनी टिपले आहे.
वेळ सोमवारी रात्री १२ वाजेची. ठिकाण : ठक्कर बाजार बसस्थानक. बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या एकट्या महिलेकडे एकटक बघत त्यानंतर महिला उठून बाहेर रस्त्यावर आली असता तिचा पाठलाग करून संशयित इसमाने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तसेच दुस-या घटनेत रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पंचवटी कारंजा, रामकुंड परिसरात अशाचप्रकारे दोघा महिलांना एकटे बघून अश्लील हावभाव करत छेड काढण्याचा प्रयत्न दोघांकडून झाला. रात्री महिलांची छेड काढणाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. ठक्कर बाजार बसस्थानकात संशयित कमलकुमार गिरधारीलाल खेमानी (५२, रा.चेतनानगर ) याने साध्या वेशातील महिला पोलिसांकडे एकटक बघून त्यांच्या स्त्रीमनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन तर केलेच; मात्र अशोकस्तंभापर्यंत त्याच्या खासगी वाहनाने पाठलाग केल्याचे पोलिसांनी सांगितले. खेमानी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रसंग २ : पंचवटी पोलीस ठाणे : येथील पंचवटी कारंजा, रामकुंड परिसरात साध्या वेशात महिला पोलीस रस्त्यांवर एकट्या फिरत होत्या. कारंजाजवळ महिला रिक्षाची वाट पाहत उभी आहे, असे भासविण्यात आले. यावेळी तेथे संशयित आशिष लक्ष्मीचंद अग्रहरी (३०, रा. पंचवटी) याने येऊन महिलेकडे एकटक बघत डोळ्यांनी इशारे करून अश्लील वर्तन केले. पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेऊन विनयभंगाच्या उद्देशाने अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच रामकुंड येथे महिला पोलीस साध्या वेशात पायी फिरत असताना अक्षी अमिर इस्माईल अत्रम (४५, रा. पंचवटी) याने महिलेचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न करत हावभाव केल्याने पोलिसांनी अत्रम यास ताब्यात घेतले.
प्रसंग ३ : अंबड पोलीस ठाणे : येथील एका सिनेमागृहाजवळ पोलिसांनी ‘डिकॉय’ आखला. यावेळी साध्या वेशात उभ्या असलेल्या महिला पोलिसाकडे बघून संशयित हेमंत शिवाजी वाघ (३३, रा. पारिजातनगर), भरत अभिमान पाटील (३३, रा. एकदंतनगर), गणेश परशुराम वरूडे (३१, रा. दत्तमंदिर) या तिघांनी अश्लील हातभाव केले. तसेच ‘चल, लॉजला जाऊ’ असे बोलून स्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांचे चित्रीकरण केले असून, कलम ५०९ प्रमाणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Police 'decoy': Bumpers stabbing women at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.