पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:06+5:302021-04-17T04:14:06+5:30
बाजार समितीतील गर्दीकडे दुर्लक्ष नाशिक : बाजार समिती आवारात होणारी गर्दी कमी होत नसून बाजार समिती प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष ...
बाजार समितीतील गर्दीकडे दुर्लक्ष
नाशिक : बाजार समिती आवारात होणारी गर्दी कमी होत नसून बाजार समिती प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली जात आहे. या ठिकाणी अनेक नागरिक विनाकारण गर्दी करत असून त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हाेत आहे.
मास्ककडे अनेकांचे दुर्लक्ष
नाशिक : अनेक नागरिकांचे मास्ककडे दुर्लक्ष होत असून काही जण केवळ नावालाच मास्क लावत असल्याचे दिसते. मास्कने नाक आणि तोंड झाकणे महत्त्वाचे असताना अनेकांचे मास्क खाली सरकवलेले असल्याचे दिसून येते. यामुळे त्याचा उपयोग होत नाही.
अनेक वस्तूंची कृत्रिम टंचाई
नाशिक : मालवाहतुकीवर निर्बंध नसले तरी काही व्यावसायिकांकडून काही वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असून या वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अन्न व आषध प्रशासनाने अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
घरगुती व्यवसाय सुरू
नाशिक : कोरोनामुळे अनेक महिलांचा रोजगार बंद झाल्याने या महिलांनी घरगुती व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक ठिकाणी पोळीभाजी केंद्र सुरू झाले आहेत, तर काहींनी वाळवणाचे पदार्थ बनवून देण्याचाा व्यावसाय सुरू केला आहे. यामुळे या महिलांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
रेस्टाॅरंटमधील कामगार बेरोजगार
नाशिक : शहरातील बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये काम करणारे सुमारे आठ ते दहा हजार कामकार सध्या बेरोजगार झाले आहेत. बंदमुळे या मजुरांचे काम बंद पडले आहे. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
सार्वजनिक वाहनांना प्रवाशांची प्रतीक्षा
नाशिक : कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक बाहेर पडत नाही तर बाहेर पडणारे काही नागरिक स्वत:च्या वाहनांचा वापर करतात. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अडचणीत आली आहे. या वाहनांना पुरेसे प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील स्वच्छता कामावर परिणाम
नाशिक : महापालिकेतील काही सफाई कामगार कोरोनाबाधित झाल्याने शहरातील स्वच्छतेवर त्याचा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. काही परिसरात स्वच्छता कर्मचारी येत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
नाशिक : उपनगर येथील वैभव सोसायटीमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेले रस्ता दुरुस्तीचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असून यामुळे स्थानिक रहिवाशांना सोसायटी परिसरात वावरताना अडथळा निर्माण होत आहे. हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागरी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
सेवाभावी संस्थांकडून विविध उपक्रम
नाशिक : कोरोना रुग्ण वाढत असल्याने या रुग्णांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी उपक्रम सुरू केले आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही सेवाभावी संस्थांकडून जेवण पुरविले जात आहे, तर काहींनी इतर मदत कार्य करण्यास पुढाकार घेतला आहे.