‘कारवाईच्या नावाखाली पोलीस मागतात पैसे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:22+5:302021-06-25T04:12:22+5:30
पोलीस आयुक्तालयातर्फे अंबड येथील पोलीस ठाण्याच्या जागेत गुन्हेगार सुधार योजनेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पाण्डेय यांच्यासह ...
पोलीस आयुक्तालयातर्फे अंबड येथील पोलीस ठाण्याच्या जागेत गुन्हेगार सुधार योजनेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पाण्डेय यांच्यासह अन्य अधिकारीही उपस्थित होते. यावेळी अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलीस ठाण्यातील सुमारे ७० पेक्षा अधिक गुन्हेगारांना सुधारण्याची संधी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
यावेळी पाण्डेय म्हणाले, रेकॉर्डवरील गुन्हेगारांना प्रवाहात आणून वर्षभरात त्यांचे वर्तन सुधारण्याकरिता त्यांना संधी या योजनेद्वारे दिली जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून वर्तणूक सुधारत असल्याची खात्री पटल्यास गुन्हेगारांवरील गुन्हे मागे घेतले जातील असेही पाण्डेय यांनी स्पष्ट केले, तसेच स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस विभाग प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून लिहून घेण्यात आलेल्या बंधपत्रानुसार (बाँड) त्यांच्या वर्तनात होत असलेली सुधारणा किंवा करीत असलेला उद्योगधंदा, नोकरी याबाबतची माहिती दरमहा संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देणे बंधनकारक राहणार आहे. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, किशोर मोरे, नीलेश माईनकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.