नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त
By संजय पाठक | Published: July 19, 2022 11:25 AM2022-07-19T11:25:39+5:302022-07-19T11:26:36+5:30
नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाजवळ सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संजय पाठक
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत काल झालेल्या बैठकीस उपस्थित राहणाऱ्या नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाजवळ सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन दिवसांपासून खासदार गोडसे हे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी सद्य परिस्थितीत शिवसेनेने भाजपासोबत जावे अशी भूमिका घेतली होती त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत देखील ते सहभागी झाले होते. आपण शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे असल्याचे त्यांनी सांगितले होते व हीच भूमिका खासदार प्रतापराव जाधव यांनी बैठकीत मांडली असे गोडसे यांनी सांगितले. भाजपाशी नैसर्गिक युती करावी असे यापूर्वीही आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते असे ते म्हणाले होते.
दरम्यान त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेनंतर आता नाशिक येथील खडकाळी सिग्नल जवळील त्यांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.