मोहाडी येथे पोलिसांनी काढली चोरांची धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:50 PM2020-02-13T23:50:08+5:302020-02-14T00:55:16+5:30
मोहाडी येथे घरफोडी करीत चोरट्यांनी १ लाख ४१ हजार रु पयांच्या ऐवजाची चोरी करून पोबारा केला होता. दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या मुसक्या आवळत मोहाडी गावातून त्यांची धिंड काढली.
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे घरफोडी करीत चोरट्यांनी १ लाख ४१ हजार रु पयांच्या ऐवजाची चोरी करून पोबारा केला होता. दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या मुसक्या आवळत मोहाडी गावातून त्यांची धिंड काढली.
मोहाडी येथील धनगर वाडा परिसरातील शिवाजी ढेपले हे कुटुंबासह बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी अंतापूर, ताहराबाद येथे धार्मिक कार्यक्र मासाठी गेले होते. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरातील ५० हजार रु पयांचा सोन्याचा नेकलेस, ६० हजार रु पयांची सोन्याची चेन, १५ हजार रु पयांचे सोन्याचे कानातील टॉप्स व १५ हजार रु पये रोकड असा एकूण १ लाख ४१ हजार रु पयांचा ऐवज चोरून नेला. दि. २३ रोजी ढेपले कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दिंडोरी पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली. त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांना मोहाडी गावामध्ये आणून संपूर्ण गावामधून चोरांची धिंड काढली.
पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करीत श्रावण पोपट भालेराव, (१९, रा. नांदूर नाका, आडगाव), उद्धव ऊर्फ टकल्या अशोक राजगिरे (१९) व ऋ षिकेश बबन गायकवाड (२०) (दोेघे रा. चुंचाळे, अंबड, नाशिक) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.