पहिने पिकनिक पॉइंटवर पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:55 PM2020-07-21T21:55:48+5:302020-07-22T00:58:52+5:30

त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे.

Police escort to the first picnic point | पहिने पिकनिक पॉइंटवर पोलिसांचा बंदोबस्त

पहिने पिकनिक पॉइंटवर पोलिसांचा बंदोबस्त

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : कोरोना संसर्गामुळे तालुक्यातील व नाशिकपासून अवघ्या ३९ किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य व निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या पहिने या छोटेखानी खेडेगावाच्या परिसरात असलेला पिकनिक पॉइंट व तेथील निसर्गरम्य परिसर सध्या ओस पडला आहे.
येथे पर्यटनप्रेमी व भाविक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. श्री त्र्यंबकराजाचे दर्शन व त्यातच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक आवर्जून येत असतात. मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दीमुळे संसर्ग वाढू शकतो. या कारणावरून पहिने येथे नाशिक, त्र्यंबक, घोटी व वाडीवºहे या तीनही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.
पहिने परिसरात पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी नेहमी गर्दीने ओसंडणारा परिसर निर्मनुष्य व ओस पडलेला आहे. अगदीच तुरळक फिरायला आलेले हौशी पर्यटक निसर्गप्रेमी पहायला मिळतात. पावसाने विश्रांती घेतली असून, पहिने परिसरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पेगलवाडी फाटा, पहिने-देवगाव रस्ता येथे त्र्यंबकेश्वर आणि वाडीवºहे पोलिसांकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पथकासह पेगलवाडी फाटा ते तोरंगण घाट या परिसरात लक्ष ठेवून आहेत.
-------------
मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या गिरणा धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
सध्या कोरोनाकाळात पर्यटन व जिल्हाबंदी असतानाही धरणावर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. या ठिकाणच्या नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी रोखताना दमछाक होत आहे. मालेगाव शहरापासून अवघ्या २५ ते २६ किलोमीटरवर असलेल्या गिरणा धरणावर सध्या शासनाच्या नियमांना व कोरोनाबंदीला हरताळ फासून नागरिक गर्दी करताना दिसत
आहेत.पाच तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाºया या धरणावर नागरिक नेहमीच गर्दी करीत असतात. मात्र सध्या सर्वत्र कोरोना रोगाने धुमाकूळ घातला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीदेखील मालेगाव, नांदगाव, मनमाड, धुळे, चाळीसगाव, जळगाव येथील हौसी पर्यटक गिरणा धरणाकडे धाव घेत आहेत. सध्या गिरणा धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी एका खासगी एजन्सीला देण्यात आली आहे. दिवसा व रात्री प्रत्येकी चार कर्मचाºयांच्या भरोशावर सुरक्षा ठेवली जात आहे. शासनाच्या वतीने एक शाखा अभियंता, तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या अपुºया कर्मचारीवर्गामुळे सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे शक्य होत नसल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे.

 

Web Title: Police escort to the first picnic point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक