दूध ओतणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

By admin | Published: June 4, 2017 02:30 AM2017-06-04T02:30:27+5:302017-06-04T02:30:53+5:30

नाशिक : स्कॉर्पिओतून आलेल्या संशयितांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले दूध ओतून दिल्याची घटना शुक्रवारी (दि़२) सायंकाळी महात्मानगर परिसरात घडली़

The police filed a complaint against the milk peddlers | दूध ओतणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

दूध ओतणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संघटनेच्या नावाने घोषणाबाजी करीत स्कॉर्पिओतून आलेल्या संशयितांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले दूध ओतून दिल्याची घटना शुक्रवारी (दि़२) सायंकाळी महात्मानगर परिसरात घडली़
सतीश नारायण कोठुळे (रा. पेठरोड, दत्तनगर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे हॉटेल सायली शेजारील गणपती मंदिराजवळील पत्र्यांच्या शेडमध्ये दूध संकलन केंद्र आहे. सायंकाळी कोठुळे यांचा पुतण्या या ठिकाणी असताना स्कार्पिओ (एमएच १५, इएक्स ५५९९) मधून आलेल्या ५ ते ६ संशयितांनी शेतकरी संघटनेच्या नावाने घोषणाबाजी करीत कॅनमधील सुमारे चारशे लिटर दूध रस्त्यावर ओतून नुकसान केले.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The police filed a complaint against the milk peddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.