लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी शोधले २९४ सुपरस्प्रेडर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:23+5:302021-06-10T04:11:23+5:30

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जागोजागी चोख बंदोबस्त, नाकाबंदीचे फिक्स पॉइंट आणि बेशिस्तांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले ...

Police find 294 superspreaders in lockdown | लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी शोधले २९४ सुपरस्प्रेडर्स

लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी शोधले २९४ सुपरस्प्रेडर्स

Next

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जागोजागी चोख बंदोबस्त, नाकाबंदीचे फिक्स पॉइंट आणि बेशिस्तांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले होते. शासनाच्या आदेशानुसार नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. तरीदेखील काही नागरिक विनाकारण फिरताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांची नाकाबंदीच्या ठिकाणी चाचणी करण्यास सुरुवात केली. मार्च ते ४ जूनपर्यंत पोलिसांना या चाचणी मोहिमेत एकूण २९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. यामुळे कोरोनाचा वाढता फैलाव कमी करण्यामध्ये पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची ठरली.

---इन्फो--

मास्कचा कंटाळा करणाऱ्यांनी भरला ६१ लाखांचा दंड

शहरात सर्वत्र वावरताना मास्कचा वापर योग्यरीत्या करणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच परस्परांमध्ये सुरक्षित सामाजिक अंतर राखणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणे साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याचा भंग ठरत असल्याने मास्कला फाटा देणाऱ्या १४ हजार ९३१ बेफिकिरांकडून सुमारे ६१ लाख ५७ हजार ४६१ रुपये इतका दंड वसूल केला. तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या २ हजार ११४ लोकांवर कारवाई करीत १२ लाख ४५ हजार २५३ रुपयांचा दंड आकारला.

---जोड स्तंभ आलेख---

विना मास्क- आकारलेला दंड

१४,९३१ - ६१,५७,४६१

सोशल डिस्टन्स-

२,११४ - १२,४५,२५३

अस्थापना कारवाई

५२२ - १९,७९०००

----पाॅइंटर्स--

अँटिजन चाचणी-६,८६५

पॉझिटिव्ह- २९४

निगेटिव्ह- ६,६४१

-------

२ कॉलम- पोलीस कारवाईचा लाईव्ह फोटो वापरावा (संग्रहित- फोटो आर वर ०९पोलीस१)

===Photopath===

090621\09nsk_23_09062021_13.jpg

===Caption===

पोलीस कारवाई

Web Title: Police find 294 superspreaders in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.