पोलिसांचा फौजफाटा रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:05+5:302021-04-16T04:14:05+5:30

संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे वाहन डिटेन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ...

Police forces on the streets | पोलिसांचा फौजफाटा रस्त्यांवर

पोलिसांचा फौजफाटा रस्त्यांवर

Next

संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे वाहन डिटेन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जागोजागी चौकी व गस्तही सुरू करण्यात आली आहे. सिन्नर शहरात सहा ठिकाणी नाकाबंदी पॉइंट असून गस्तही घालण्यात येत आहे. वेगाने वाढत असलेले कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलच्या रात्रीपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. सिन्नर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सुमारे १ हजार रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरासह ग्रामीण भागात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.

बुधवारी रात्री तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नरचे सहायक पोलीस निरीक्षक गरुड, हवालदार भगवान शिंदे, समाधान बोऱ्हाडे, विनायक आहेर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा बसस्थानकाजवळील रस्त्यावर उतरला. रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करण्यात येत होती. विनाकारण घराबाहेर पडलेल्या व मास्क न वापरणाऱ्या १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या आस्थापनाशिवाय अन्य दुकाने उघडी राहिल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

चौकट-

असे आहेत चेक पाॅइंट

सिन्नर शहरात सहा ठिकाणी चेक पॉइंट किंवा नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. महात्मा फुले पुतळा, वावीवेस, गंगावेस, आडवा फाटा, गावठा व शिवाजी चौक या सहा ठिकाणी पोलीस तैनात असणार आहेत. याशिवाय गस्ती पथक शहरातून फिरणार आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर खासगी बस, एस.टी. बस यांचीही तपासणी करण्यात आली. नियमापेक्षा जास्त प्रवासी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.

फोटो - १५ सिन्नर वावीवेस

सिन्नरच्या वावीवेस भागात तपासणीसाठी असलेले पोलिसांचे पथक.

===Photopath===

150421\15nsk_39_15042021_13.jpg

===Caption===

फोटो - १५ सिन्नर वावीवेस सिन्नरच्या वावीवेस भागात तपासणीसाठी असलेले पोलिसांचे पथक. 

Web Title: Police forces on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.