नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पोलिसांनी अशी केली आहे वाहनतळाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 10:04 PM2019-09-18T22:04:49+5:302019-09-18T22:07:32+5:30

साधुग्राम परिसरात होणा-या मोदी यांच्या सभेसाठी राज्यभरातून पोलिसांचा फौजफाटा व विशेष सुरक्षा दलाचे कमांडो शहरात दाखल झाले आहेत...

Police have arranged a vehicle for Narendra Modi's meeting | नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पोलिसांनी अशी केली आहे वाहनतळाची व्यवस्था

नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पोलिसांनी अशी केली आहे वाहनतळाची व्यवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील मार्गांवरील वाहतुकीत बदल सभेसाठी राज्यभरातून पोलिसांचा फौजफाटा

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि.१९) तपोवनातील साधुग्राम येथे सभा घेणार आहे. सभेसाठी उत्तर महाराष्ट्रातून लाखो नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज गृहीत धरून शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी चौहोबाजूंनी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने अधिकृत वाहनतळातच उभी करावी. अधिसूचनेनुसार वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, वाहनचालकांनी त्याची अंमलबजावणी करत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले आहे.
तपोवन येथील साधुग्राम परिसरात होणा-या मोदी यांच्या सभेसाठी राज्यभरातून पोलिसांचा फौजफाटा व विशेष सुरक्षा दलाचे कमांडो शहरात दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
-
अशी आहे वाहनतळाची व्यवस्था
दिंडोरीरोड व पेठरोडकडून येणारी वाहतूक
पेठरोड व दिंडोरीरोडकडून नाशिक शहरात येणारी वाहतूक व सभेसाठी येणाºया नागरिकांनी आरटीओ सिग्नल येथून डावीकडे वळण घेत रासबिहारी चौफुलीमार्गे निलगिरी बागेतील सिद्धिविनायक लॉन्ससमोर वाहनतळापर्यंत वाहने आणावी.
---
मुंबईकडून येणारी वाहतूक
मुंबईकडून येणारी तसेच अंबड, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सभेसाठी येणारी सर्व वाहने मुंबई-आग्रा रोडने द्वारका सर्कल, टाकळी फाटा येथून तिगरानिया रोडने ट्रॅक्टर हाउससमोरून काशीमाळी मंगल कार्यालयापासून गोदावरी घाटावर जातील. त्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून तपोवन नर्सरी रस्त्याने नागरिकांनी सभास्थळी पायी जावे लागेल.
---
पुणे महामार्गावरील वाहतूक
पुणे महामार्गावरून सभेसाठी येणारी वाहतूक नाशिकरोड उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूने खाली उतरून बिटको सिग्नल येथून उजव्या बाजूने जेलरोडमार्गे पुढे दसक, नांदूरनाका सिग्नल, औरंगाबादरोडने मिर्ची सिग्नल येथून जेजूरकर मळ्यासमोरील मोकळ्या पटांगणातील वाहनतळापर्यंत जातील. या वाहनतळापासून नागरिकांनी पायी सभास्थळापर्यंत जावे लागेल.
--

औरंगाबाद रोडने येणारी वाहतूक
औरंगाबाद रोडने येणा-या वाहतुकीसाठी जनार्दन मठाजवळील इंद्रायणी लॉन्ससमोरील मोकळ्या जागेत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे नागरिकांनी आपली वाहने उभी करून तेथून पुढे त्यांना पायी सभास्थळी जावे लागेल.
--

धुळेकडून येणारी वाहतूक
धुळे, मालेगाव, चांदवड, ओझरमार्गे शहरात सभेसाठी येणारी वाहतूक मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरापासून डावीकडे वळण घेत डाळिंब मार्केट येथील वाहनतळापर्यंत जाईल. तेथून सभास्थळी पायी जावे लागणार आहे.
-------
शहरवासीयांनी या मार्गाने पोहोचावे सभास्थळी
शहरातील वाहतूक काट्या मारु ती चौकाकडून उजव्या बाजूला वळण घेत टकलेनगर, कृष्णानगर, तपोवन क्र ॉसिंग रोडकडे जाईल. तसेच संतोष टी-पॉइंट येथून उजवीकडे वळण घेत तपोवन क्र ॉसिंगला डाव्या बाजूला वळण घेऊन पुन्हा तपोवन रोडकडे मार्गस्थ व्हावे. संत जनार्दन स्वामी आश्रमापुढील लक्ष्मीनारायण लॉन्स समोरून चौफुली ओलांडून तपोवन रोडने कपिला संगमच्या पुढे उभारण्यात आलेल्या वाहनतळापर्यंत वाहने थेट जातील.
----
दुचाकीला बटुक हनुमान मंदिरापर्यंत प्रवेश
सभेसाठी दुचाकीवरून शहरातून येणाऱ्या नागरिकांनी त्यांची दुचाकी वाहने लक्ष्मीनारायण मंदिरासमोरून बटुक हनुमान मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात सुरक्षित उभी करावी. तेथून पायी चालत सभास्थळापर्यंत पोहचावे.
----
या मार्गांनी सोडावे नाशिक शहर
मुंबई-आग्रारोडने येणारी हलकी वाहने थेट उड्डाणपुलावरून द्वारक ामार्गे शहराबाहेर मुंबईच्या दिशेने जाऊ शकतील. तसेच मुंबईकडून येणारी हलकी वाहने धुळेकडे मार्गस्थ होताना द्वारका येथून उड्डापुलाचा वापर करतील. क. का. वाघ कॉलेज येथे ही वाहतूक उड्डाणपुलावरून उतरून धुळ्याच्या दिशेने महामार्गावरून रवाना होईल. द्वारका येथून सर्व लहान व हलक्या वाहनांनी उड्डाणपुलाचा वापर धुळ्याकडे जाण्यासाठी करावा. तसेच मुंबईहून-औरंगाबादच्या दिशेने जाणारी वाहने द्वारकामार्गे पुणे महामार्गावर वळण घेऊन थेट बिटको चौक सिग्नलवरून डावीकडे वळण घेऊन जेलरोडवरून नांदूरनाकामार्गे औरंगाबाद महामार्गावर जातील.

Web Title: Police have arranged a vehicle for Narendra Modi's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.