पोलीस हतबल : नाशिककरांच्या दुचाकी भरदिवसा होताहेत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 03:45 PM2019-02-13T15:45:14+5:302019-02-13T15:48:43+5:30

नाशिक : परिसरातील पंचवटी म्हसरूळ तसेच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी होण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने ...

 Police have been running a bike for Nashik's two-wheeler | पोलीस हतबल : नाशिककरांच्या दुचाकी भरदिवसा होताहेत लंपास

पोलीस हतबल : नाशिककरांच्या दुचाकी भरदिवसा होताहेत लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देबडी दर्गाच्या प्रारंगणातून दुचाकी गायबपोलीस कर्मचारी देखील हतबल झाले टोळीत विधीसंघर्षित अल्पवयीन बालकांचा समावेश

नाशिक : परिसरातील पंचवटी म्हसरूळ तसेच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी होण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने वाहनधारक संतप्त झाले आहे. परिसरातून दररोज किमान एक ते दोन दुचाकी चोरी होत असल्याने दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तिवली जात आहे. परिसरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार घडत असल्याने पोलीस कर्मचारी देखील हतबल झाले आहेत.
रहिवाशांनी त्यांच्या दारापुढे किंवा सोसायट्यांच्या वाहनतळातील दुचाकी सुरक्षित आहे, किंवा राहतील याची शाश्वती पंचवटीसह म्हसरूळ, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील परिसराबाबत देता येत नाही. बनावट चावीचा वापर करत दुचाकी चोर सर्रास हॅण्डल लॉक तोडून दुचाकीची पळवून नेत असल्याचे उघडकीस येत आहेत. याप्रकारचे गुन्हे दररोज या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल होत आहे. गायत्री किरण कडाळे (२५,रा.पेठरोड) यांच्या मालकीची २० हजार रुपये किं मतीची मोपेड दुचाकी (एम.एच १५ईडब्ल्यू ५१९४) प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरून अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली. विशेष म्हणजे कडाळे यांनी दुचाकी त्या राहत असलेल्या विजय संकुल या राहत्या इमारतीच्या वाहनतळात उभी केली होती.
दुचाकी चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता मात्र त्यानंतर आता पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांना राहत असलेल्या इमारतीच्या वाहनतळावर वाहने लावताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. चोरट्यांच्या टोळीत विधीसंघर्षित अल्पवयीन बालकांचा समावेश असून त्यांच्यामार्फत काही सराईत गुन्हेगार दुचाकी चोरीच्या घटना घडवून आणल्याचे बोलले जात आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका चारचाकी वाहनविक्रीच्या शोरूमच्या वाहनतळात उभी केलेली पल्सर दुचाकी (एमएच१४ डीसी ३०७५) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिषेक किशोर पाटील यांच्या मालकीची तीस हजाराची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे.

बडी दर्गाच्या प्रारंगणातून दुचाकी गायब
भद्राकली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच असून दोन दिवसांपुर्वीच सीबीएस परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पिंजारघाट बडी दर्गा येथे दर्शनासाठी आलेले भाविक आवेज रफिक अत्तार (३४,रा.पालखेड दिंडोरी) यांची होंडा पॅशन दुचाकी (एम.एच १५ अ‍ेझेड ९५०३) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  Police have been running a bike for Nashik's two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.