पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 05:55 PM2019-09-15T17:55:41+5:302019-09-15T17:56:06+5:30

म्हसरूळ पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई गांगुर्डे यांच्याविरुद्ध विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शारीरिक-मानिसक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Police husband charged with molesting wife | पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीवर गुन्हा

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीवर गुन्हा

Next
ठळक मुद्देपिडित महिलेचा शारिरिक-मानसिक छळ

नाशिक : म्हसरूळ-बोरगड परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने फारकत दयावी यासाठी संशयित पोलीस पतीने पिडित महिलेचा शारिरिक-मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीसांनी विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगड परिसरात राहणा-या पिडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पिडितेचे पती संशयित नीलेश आत्माराम गांगुर्डे हे पत्नीने घटस्फोट द्यावा, म्हणून सातत्याने दबाव वाढवून शिवीगाळ व मारहाण करत छळ करत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने फिर्यादीत केला आहे. त्यानुसार म्हसरूळ पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई गांगुर्डे यांच्याविरुद्ध विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शारीरिक-मानिसक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार सोर करीत आहेत.

Web Title: Police husband charged with molesting wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.