कामगारांना पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण : पोलिसांचा निषेध

By admin | Published: May 28, 2017 10:19 PM2017-05-28T22:19:10+5:302017-05-28T22:19:10+5:30

इगतपुरी तालुक्यातील मोनियार रुफिंग कंपनी मालकाची झुंडशाही आणि कामगारांना पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण

Police inhuman workers in police station: protest of police | कामगारांना पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण : पोलिसांचा निषेध

कामगारांना पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण : पोलिसांचा निषेध

Next

सातपूर : इगतपुरी तालुक्यातील मोनियार रुफिंग कंपनी मालकाची झुंडशाही आणि कामगारांना पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात दाद मागण्यासाठी सिटू युनियनच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर दि. ३ रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.
डॉ. कराड यांनी सांगितले की, मोनियार रुफिंग कंपनीतील कामगारांनी सिटूचे युनियनचे नेतृत्व स्वीकारले म्हणून या कंपनी मालकाने कामगारांना कामावर घेणे बंद केले. खोटे आरोप पत्रे, कारणे दाखवा नोटिसा देऊन दडपशाही चालू ठेवली. दीड वर्षापासून कामगारांना काढून टाकले. सिटूने कामगार उपायुक्त, कामगार आयुक्त, मुंबई, कामगारमंत्री जिल्हाधिकारी, तहसीलदार, खासदार आदिंसह शक्य असलेल्या सर्वांकडे या अन्यायाविरु द्ध चर्चा करून निवेदने दिली आहेत. न्याय न मिळाल्यामुळे अखेरचा उपाय म्हणून आॅगस्ट २०१६ मध्ये कामगारांनी आमरण उपोषण केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडले. तरीही मालक आपल्या कठोर निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी बगाटे यांच्या दालनात सहायक कामगार उपायुक्त इळवे, युनियनचे जनरल सेक्रे टरी डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे यांची संयुक्त बैठक झाली. कामगाराकडून हमीपत्र घेऊन त्यांना कामावर घेण्याचे व कामावर घेतल्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे ‘निर्देश’ बगाटे यांनी व्यवस्थापनाला दिले.

Web Title: Police inhuman workers in police station: protest of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.