प्रेमवीरांवर पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:29 PM2020-02-13T22:29:42+5:302020-02-14T00:57:04+5:30
प्रेमाच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्यांसह शहरातील कायदा व सुव्यवसथा बाधित राखण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रेमीयुगुलांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणांवर किंवा कॅफेमध्ये अवैधरीत्या खोल्यांमध्ये आढळल्यास गजाआड व्हावे लागेल, असा निर्वाणीचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत : प्रेमाच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्यांसह शहरातील कायदा व सुव्यवसथा बाधित राखण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रेमीयुगुलांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणांवर किंवा कॅफेमध्ये अवैधरीत्या खोल्यांमध्ये आढळल्यास गजाआड व्हावे लागेल, असा निर्वाणीचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
बुधवारी (दि. १२) पोलिसांना शहरातील कॅफेत अश्लील चाळे केले जातात याची माहिती मिळाल्याने शहरातील कॅफेचालकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच असे कृत्य थांबविण्यासाठी शहरातील कॅफेंवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकही नियुक्त करण्यात आले आहे. मिनी दुबई व व्यापारी शहर व तालुक्यातील सर्वात मोठे महाविद्यालय असल्याने अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना व महाविद्यालय तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी विविध दुकाने थाटली आहेत. यामध्ये कॅफेचादेखील समावेश आहे व येथील कॅफे बदनामीच्या फेºयातदेखील आहेत. युवक-युवतींना एकांत मिळावा, यासाठी कॅफेमध्ये विशिष्ट सोय केली आहे. कॅफेत युवक व युवती एकत्र किती वेळ घालविणार, त्यावर तेथील बिल ठरते, याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी कॅफेचालकांना बोलावून नोटिसा बजावल्या व व्हॅलेंटाइन डेमुळे कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, यासाठी पोलीस करडी नजर ठेवून आहेत. प्रेमाच्या नावाखाली स्वैराचार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यंदा प्रेमदिनी कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस अधिक सज्ज झाले आहेत.
कॅफे बुक केलेल्यांचा हिरमोड
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तरु ण-तरु णींना एकांत मिळावा म्हणून काही व्यावसायिकांनी परिसरात कॅफे व हॉटेलची सोय केली आहे. प्रेमीयुगुल किती वेळ येथे थांबणार यानुसार वेगवेगळे दर आकारून बुकिंग करण्यात आले होते, मात्र कॅफेचालकांना पोलिसांनी नोटिसा दिल्याने अनेकांनी बुकिंग रद्द केले तर पोलिसांच्या भीतीमुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे.
कॅफेत किंवा हॉटेलमध्ये बसून तरु ण-तरु णी बोलत असतील तर त्यास आक्षेप असण्याचेही कारण नाही, मात्र तेथे कोणी अश्लील चाळे करताना दिसून आल्यास त्यांना गजाआड व्हावे लागेल. तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलीस व नागरिकांची जबाबदारी आहे.
- कुणाल सपकाळे,
सहायक पोलीस निरीक्षक
व्हॅलेंटाइन डे असल्याने शहरात कडक कारवाई केली जाते. त्यामुळे अनेक तरु ण-
तरु णींनी ग्रामीण भागाकडे धाव घेतली. या भागातील हॉटेल्समध्ये अश्लील चाळे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पोलिसांनी हॉटेल्सची तपासणी करावी.
- नंदू पवार, सामाजिक कार्यकर्ते