पोलिसांच्या ‘मार्च’मुळे नागरिकांमध्ये धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:25+5:302021-09-14T04:18:25+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात असून, कुठलाही अनुचित प्रकार व गुन्हेगारीच्या घटना घडू नये ,काही घटना घडल्यास ...

Police 'march' causes panic among citizens | पोलिसांच्या ‘मार्च’मुळे नागरिकांमध्ये धावपळ

पोलिसांच्या ‘मार्च’मुळे नागरिकांमध्ये धावपळ

Next

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात असून, कुठलाही अनुचित प्रकार व गुन्हेगारीच्या घटना घडू नये ,काही घटना घडल्यास पोलीस प्रशासन किती सज्ज आहे, तसेच गुन्हेगार व गुन्हेगारी टोळीवर वचक निर्माण व्हावा यासाठी रूट मार्च काढण्यात आला. पंचवटी पोलीस ठाणे येथून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. फुलेनगर, शनी मंदिर, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, गजानन चौक, काट्या मारुती पोलीस चौकी, हिरावाडी, एसएसडी नगर, तारवालानगर, समर्थनगर, मखमलाबाद नाका, पेठरोड।परिसरातून पोलिसांनी फेरी मारली. या मार्चमध्ये सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. डंबाळे, सत्यवान पवार, रोहित केदार, बाळासाहेब मुर्तडक, शेखर फरताळे, अंकुश सोनजे, अश्विनी उबाळे, राम घोरपडे, आदी कर्मचारी, एसआरपी, क्युआरटी, आरसीपी, होमगार्ड, सहभागी झाले होते.

(फोटो आहे डेस्कॅनवर)

Web Title: Police 'march' causes panic among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.