आयपीएल मॅच सट्ट्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:09 AM2018-05-21T01:09:25+5:302018-05-21T01:09:25+5:30

सुरगाणा : दोन संशयितांना अटक; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ४० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़

Police match on IPL matches | आयपीएल मॅच सट्ट्यावर पोलिसांचा छापा

आयपीएल मॅच सट्ट्यावर पोलिसांचा छापा

Next
ठळक मुद्देसुरगाणा : दोन संशयितांना अटक ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ४० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़
आयपीएल क्रिकेट मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा क्रिकेट सामना सुरू होता़ या सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक करपे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पांचाळ गल्लीतील एका खोलीत छापा टाकला असता संशयित विशाल सुधाकर शिरसाठ (३३) व तुषार उल्हास आहेर (२६, दोघेही रा़ कृष्णनगर, सुरगाणा) हे साथीदारांसह आयपीएल मॅचवर लॅपटॉप व मोबाइलद्वारे लोकांकडून पैसे लावून घेऊन सट्टा खेळताना व खेळविताना आढळून आले़
उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, हवालदार दीपक अहिरे, हनुमंत महाले, वसंत खांडवी, जालिंदर खराटे, अमोल घुगे, शिपाई हेमंत गिलबिले, संदीप लगड यांनी ही कामगिरी केली़ पोलिसांनी या दोघा संशयितांकडून सहा मोबाइल फोन, लॅपटॉप,
७ हजार ८८० रुपये रोख, बेटिंगचे आकडे लिहिलेले रजिस्टर असा
३८ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला़ या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Police match on IPL matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा