कळवणमधील सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:14 PM2019-03-05T23:14:44+5:302019-03-05T23:17:33+5:30

कळवण : अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही फक्त जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध आहे. जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेऊन योजनेला विरोध दर्शविला. दरम्यान, पोलिसांनी कळवणच्या सर्व नेत्यांना नोटिसा बजावल्याने पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Police notices to all political leaders in Kalvan | कळवणमधील सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा

कळवणमधील सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा

Next
ठळक मुद्देपुनंद प्रकल्प : सटाण्याच्या थेट जलवाहिनीला विरोध

कळवण : अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही फक्त जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध आहे. जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेऊन योजनेला विरोध दर्शविला. दरम्यान, पोलिसांनी कळवणच्या सर्व नेत्यांना नोटिसा बजावल्याने पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सटाणा नगर परिषदेने पोलीस यंत्रणेकडे जलवाहिनी योजना पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडे पोलीस बंदोबस्त मागितला असल्याने या पार्श्वभूमीवर कळवणचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, अभोण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी पुनंद प्रकल्प पाणीपुरवठा योजनेसंदर्भात तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, आंदोलक नेते यांची मंगळवारी सायंकाळी तातडीची बैठक बोलवून योजनेबाबत भूमिका जाणून घेतली.
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, शेतकरी नेते शांताराम जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, माकपचे मोहन जाधव, नीलेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सेल जिल्हाध्यक्ष रामा पाटील व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक कळवण पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली.
पुनंद प्रकल्प, चणकापूर प्रकल्पातून पाण्याची वाढलेली मागणी, शासनाची भूमिका, तालुक्यातील पाण्याची आज आणि परिस्थिती व मागणी, पुनंद प्रकल्प अंतर्गत असलेल्या जलवाहिनी योजनेला विरोध संदर्भात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, शेतकरी नेते शांताराम जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली व पाणीपुरवठा योजनेला विरोध केला. सटाणा नगर परिषदेने जलवाहिनी योजनेचा अट्टाहास न करता कालव्याद्वारे पाणी घेऊन जावे, साठवण बंधारा बांधून तेथून जलवाहिनीद्वारे पाणी न्यावे, अशी भूमिका कळवणच्या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी घेतली.
राज्य सरकारने पुनंद प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, पाइपलाइनचे काम आगामी काळात सुरू होणार असल्याने अडथळा आणू नका, अशी अपेक्षा पोलीस यंत्रणेने यावेळी व्यक्त करून राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची असल्याचे यावेळी सांगितले.
दरम्यान राज्य सरकार शासकीय व पोलीस यंत्रणेचा वापर करून दबाव आणून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरासाठी जलवाहिनीद्वारे पाणी तर जाऊ देणार नाही, परंतु कालव्याद्वारे देखील पाणी देण्यास आमचा विरोध राहील अशी भूमिका कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतली आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सटाणा नगर परिषदेचे पदाधिकारी व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन याप्रश्नी चर्चा करण्याची तयारी कळवणच्या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बैठकीत दाखवली. पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हेसटाणा शहराकरिता पाइपलाइन योजना शासनाने मंजूर केली आहे. ९ फेब्रुवारी रोजी पुनंद प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. सदर योजनेचे काम लवकर सुरू होणार आहे. या कामात अडथळा आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामास विरोध व अडथळा आणून शांततेचे उल्लंघन
व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल.
असा आशयाची नोटीस कळवण पोलीस स्टेशनने मंगळवारी झालेल्या बैठकीत उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिली. शासनाचे पोलीस यंत्रणेकडून दबाव आणून योजना पूर्ण करण्याचे स्वप्न धुळीस मिळवू, जलवाहिनी योजनेचा पाइप तालुक्यात उतरू देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतल्याने पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Web Title: Police notices to all political leaders in Kalvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी